Ganesh Festival : कलाकारांचे नऊ तास वादन (व्हिडिओ)

टिळक रस्ता - श्री छत्रपती शिवाजी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शारदा गजानन मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ‘कलावंत ढोलताशा पथका’मध्ये अभिनेत्री श्रुती मराठेसह अन्य मराठी कलावंतांनी ढोलताशा वाजवून सेवा दिली.
टिळक रस्ता - श्री छत्रपती शिवाजी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शारदा गजानन मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ‘कलावंत ढोलताशा पथका’मध्ये अभिनेत्री श्रुती मराठेसह अन्य मराठी कलावंतांनी ढोलताशा वाजवून सेवा दिली.

पुणे - मोरया... मोरया...  गणपती बाप्पा मोरया... असं म्हणतं गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल-ताशा पथकाने रंगत आणली. त्यांनी सलग नऊ तास ढोल-ताशावादन केलं. कलाकारांना पाहण्यासह त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी तरुणाईची गर्दी वाढत होती.

कलावंत ढोल-ताशा पथकामध्ये अभिनेता सौरभ गोखले, आस्ताद काळे, केतन क्षीरसागर, अमित रानडे, तेजस बर्वे यांच्यासह अनुजा साठे, शाश्‍वती पिंपळीकर, श्रुती मराठे, नूपुर दैठणकर, ईशिता गांगुली, स्वप्नाली पाटील, करिष्मा कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील तरुणाई सहभागी झाली होती. 
या पथकाचे हे पाचवे वर्षे असून यंदा सातव्या दिवशी मुंबईत सिद्धिविनायक मंडळासमोर वादन करण्याचा मान त्यांना मिळाला होता. पुण्यामध्ये दुपारी चारच्या दरम्यान हे पथक मार्केट यार्ड येथील शारदा गजानन मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास बाबू गेणू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले. ते रात्री एकपर्यंत वादन करत होते.

सौरभ म्हणाला, ‘‘आम्ही दरवर्षी चित्रीकरणाचे नियोजन करून जवळपास महिनाभर सराव करतो. सर्व जण यामध्ये सेवा म्हणून सहभागी होतात. यातून आम्हाला ऊर्जा मिळते अन्‌ ती वर्षभर टिकते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com