एलईडी भिंतीवरून पोलिसांची गर्दीवर नजर

फरासखाना पोलिस ठाणे - गणेशोत्सवात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली एलईडी भिंत.
फरासखाना पोलिस ठाणे - गणेशोत्सवात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली एलईडी भिंत.

पुणे - गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी १६ सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर नजर ठेवणे सोपे झाले आहे.

पुण्याचा गणेशोत्सव, देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून असंख्य भाविक येतात. त्या वेळी या भागात पाकीटमार, मोबाईल व पर्स चोरट्यांचाही सुळसुळाट होत असल्याने देखावे पाहण्यात दंग असलेल्या भाविकांचे साहित्य गर्दीत चोरीला जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीवर भर दिला आहे.

अप्पा बळवंत चौक, मंडई, बेलबाग चौक, बुधवार चौक, शनिपार, शनिवारवाडा, नातूबाग, शिवाजी रस्ता या परिसरात जास्त गर्दी होते. तसेच, उपनगरांमधून येणारे भाविक हे पुणे मनपा, स्वारगेट, डेक्कन जिमखाना, मालधक्का चौक व रास्ता पेठ या भागांतून येतात. त्यामुळे तेथेही पोलिसांची नजर आवश्‍यक असल्याने शिवाजीनगर, स्वारगेट, डेक्कन, फरासखाना, खडक, विश्रामबाग या सहा पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या २०० कॅमेऱ्यांवर सहा कर्मचारी २४ तास लक्ष ठेवून आहेत. यासाठी खास फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात नियंत्रण कक्ष तयार केला आहे. 

यापूर्वी एका खोलीत छोट्या टीव्हीवरून सीसीटीव्ही तपासले जात होते. पण, यंदा मोठा एलईडी लावण्यात आला आहे. त्यावर एखाद्या कॅमेऱ्यातील चित्रण व्यवस्थित पाहायचे असेल, तर त्या एलईडी भिंतीवर स्पष्ट पाहता येते. एकाच वेळी अनेक पोलिसांचे लक्ष या भिंतीवर असल्याने गर्दीवर बारकाईने नियंत्रण ठेवता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com