गणेशोत्सवासाठी एसटीच्या जादा बस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

गौरी - गणपतीकरिता कोकणवासीयांसाठी कोकण प्रवासी संघ पिंपरी- चिंचवडच्या वतीने ता. ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान एसटीच्या जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रुप बुकिंग सुरू असल्याची माहिती दादा हाटले यांनी दिली.

पिंपरी - गौरी - गणपतीकरिता कोकणवासीयांसाठी कोकण प्रवासी संघ पिंपरी- चिंचवडच्या वतीने ता. ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान एसटीच्या जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रुप बुकिंग सुरू असल्याची माहिती दादा हाटले यांनी दिली.

प्रवासी संघ सामाजिक बांधीलकीतून गेले नऊ वर्षे हा उपक्रम राबवत आहे. सिद्धिविनायक प्रतिष्ठान निगडी येथे बुकिंगची सोय करण्यात आली आहे. कोकणवासीयांसाठी सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, देवगड, राजापूर या मार्गांवर जादा बसगाड्या सोडण्यात येत आहे. या संधीचा लाभ कोकणवासीयांनी घ्यावा, असे आवाहनही हाटले यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav Extra ST Transport