सराफी व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्याकडून 17 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

स्वारगेट पोलिसांनी ठोकल्या बेड्या, रोख रक्कम, पिस्तुलासह 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Gang arrested robbing Rs 17 lakh cash from goldsmith employee pune
Gang arrested robbing Rs 17 lakh cash from goldsmith employee pune Sakal

पुणे : सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी नांदेड येथून आलेल्या सराफी व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील 17 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीच्या स्वारगेट पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडुन रोख रक्कम, पिस्तुल असा 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि घटना 7 मार्च रोजी सकाळी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळ घडली होती.

शरीफ मोहमद सरवर शेख (वय 54, रा. नांदेड), विपीनदास द्वारकादास तिवारी (वय 35, रा. इंदौर, मध्य प्रदेश), कपिल विरसींग यादव (वय 29, झाशी, उत्तर प्रदेश), भुपेंद्र शामलाल राय (वय 30, बिना, मध्यप्रदेश), शैलेंद्रकुमार रामसेवक राय (वय 31, रा. उरई, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सत्यनायरण सोनी (वय 27, रा.गंगासिटी नांदेड) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील सराफी व्यावसायिक सोनी हे पुण्यातील सोने-चांदीच्या बाजारपेठेतून शुद्ध सोने खरेदी करतात. त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या सराफी पेढीतील कामगार शंकर भालेराव यास 6 मार्च रोजी पुण्याला सोने खरेदी करण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी त्याच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी 17 लाख रुपयांची रक्कम दिली होती. त्यानुसार, तो नांदेड येथुन खासगी बसने 7 मार्चला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील वेगा सेंटर येथे आला. त्यावेळी आरोपींनी त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून व पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम चोरुन नेली होती.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या पथकांकडुन सुरु होता. दरम्यान, भालेरावच्या हालचालीवर देखरेख ठेवण्याचे काम शरीफ शेख हा सराईत गुन्हेगार करीत होता. मागील एक महिन्यापासून ते कामगारावर पाळत ठेवून होता. घटनेच्या दिवशी त्याने कामगारासोबत बसमधून प्रवास केला. तर अन्य आरोपींनी त्यांच्या कारमधून बसचा पाठलाग करीत त्यांनी ही लुटमार केल्याचे तपासात उघड झाले होते.दरम्यान, पोलिसांच्या पथकाने नांदेड ते पुणे दरम्यानच्या सर्व टोल नाक्‍यांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामध्ये संबंधित संशयित कार पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानुसार, पोलिसांनी कारचा शोध घेतला. परंतु ती कारही चोरीची निघाली. दरम्यान, पथकाने नांदेड येथे तपास सुरु केला. तेव्हा शरीफ शेख हा तेथे फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला. आठ दिवस सलग तपास करून पोलिसांनी आरोपींनी अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com