दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

लोणी काळभोर : उरुळी कांचन ते शिंदवणे मार्गे जेजुरी रस्त्यावरील जय मल्हार पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी (ता. २०) दुपारी अटक केली. शुभम उर्फ सोन्या कैलास कामठे (वय - २३, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हा या टोळीचा प्रमुख असून पोलिसांनी त्याच्यासह अक्षय उत्तम कांबळे (वय - २१, कदमवाकवस्ती, ता. हवेली), प्रेम उर्फ प्रितम सुनील सुतार (वय - २१, रा. बेंदवाडी, फुरसुंगी, ता. हवेली) व आकाश प्रकाश काकडे (वय - २६, रा.

लोणी काळभोर : उरुळी कांचन ते शिंदवणे मार्गे जेजुरी रस्त्यावरील जय मल्हार पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी (ता. २०) दुपारी अटक केली. शुभम उर्फ सोन्या कैलास कामठे (वय - २३, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हा या टोळीचा प्रमुख असून पोलिसांनी त्याच्यासह अक्षय उत्तम कांबळे (वय - २१, कदमवाकवस्ती, ता. हवेली), प्रेम उर्फ प्रितम सुनील सुतार (वय - २१, रा. बेंदवाडी, फुरसुंगी, ता. हवेली) व आकाश प्रकाश काकडे (वय - २६, रा. दुर्वांकुर सोसायटी, ससाणेनगर, हडपसर, पुणे) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचा चौथा साथीदार ऋषिकेश पवार (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) हा पळून जाण्यात यशस्वी ठरला.

पोलिसांनी त्यांच्याकडून लोखंडी कोयता, बेसबॉलचे दांडके, एक गावठी पिस्तुल, ४ राउंड, सुती दोरी व मिरची जप्त केला. अटक केलेल्या आरोपींपैकी शुभम कामठे, आकाश काकडे व प्रेम सुतार यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात तर शुभम व अक्षय कांबळे यांच्यावर लोणी काळभोर पोलिसांत दरोडा, मारामारी व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. तसेच प्रेम सुतार याच्यावर वडगाव मावळ व चाकण या दोन पोलीस ठाण्यांमध्ये दरोड्याच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल आहे.
  
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) गावाच्या हद्दीतील जय मल्हार पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी शुभम कामठे व त्याचे साथीदार येणार असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्यामार्फत लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस नाईक समीर चमनशेख, रॉकी देवकाते, सागर कडु हे सार्वजण खाजगी वाहनातून शिंदवणे घाटाच्या परिसरात आरोपींविरोधात सापळा रचला होता. सव्वातीन वाजण्याच्या सुमारास वरील सर्व आरोपी तीन दुचाकीवरून जेजुरीच्या बाजूने शिंदवणे घाट उतरून खाली आले. याचवेळी तीनपैकी दोन दुचाकीवरील शुभम कामठे, अक्षय कांबळे, प्रेम सुतार व आकाश काकडे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच तिसऱ्या दुचाकीवरील ऋषिकेश पवार हा डोंगराच्या माथ्याचा आधार घेवून फरारी झाला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची  चौकशी केली असता पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची त्यांनी कबुली दिली. 

 
शुभम कामठे व त्याच्या साथीदारांवर हडपसर, लोणी काळभोर, वडगाव मावळ व चाकण या पोलीस ठाण्यामध्ये आठहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर दरोडे व चोऱ्यांचे गुन्हे करत असल्याने पोलीस त्यांच्या मागावर होते. शुभमसह चार जणांना अटक केली असून त्यांच्या पाचवा साथीदार ऋषिकेश पवार याच्या अटकेसाठी पोलीस रवाना झाले आहेत. त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. 
   - महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक. 

   
   
 

Web Title: the gang of robber arrested for the arrest