सराफाच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; अल्पवयीन मुलासह चौघे अटकेत

सराफाच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; अल्पवयीन मुलासह चौघे अटकेत

लोणी काळभोर : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात प्रवेश केल्यावर अल्पवयीन मुलाच्या मदतीने सराफाला गंडा घालणाऱ्या तीन महिला व चोरीसाठी मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. नंदिनी उर्फ नंदा प्रकाश चव्हाण (वय ३८ वर्षे, रा. सच्चाईमाता मंदिर, कात्रज) ही या टोळीची प्रमुख असून, अटक करण्यात आलेल्या महिलांकडून पोलिसांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सराफाच्या दुकानातून चोरलेला पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कात्रज परिसरातून नंदा चव्हाणसह रिना यशवंत पवार (वय २७ वर्षे रा. सच्चाईमाता मंदिर, कात्रज), पूनम काळू पडवळ (वय २९ वर्षे, रा.पिरंगुट ता.मुळशी) या तीन महिलांच्यासह, सोने लंपास करण्यासाठी वरील तिघींना मदत करणाऱ्या नंदा चव्हाण हिच्या चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलगा वगळता, तीनही महिला आरोपींना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकाळभोर येथील चेतन ज्वेलर्स या सराफाच्या दुकानातून तीन अनोळखी महिला व त्यांच्यासमवेत दुकानात आलेल्या अल्पवयीन मुलाने चार महिन्यांपूर्वी पाच तोळे वजनाचे दागिने लंपास केले होते. पोलिसांनी या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, फुटेजमधील वर्णनाच्या महिलेपैकी दोन महिला कात्रज परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश क्षीरसागर, फौजदार दत्ता जगताप, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, अक्षय नवले, महिला पोलिस कर्मचारी सुरेखा लोंढे, लता जगताप, पूनम कांबळे यांनी कात्रज परिसरात साध्या वेशात जाऊन विचारपूस सुरु केली होती.

यात वरील पथकाला नंदा चव्हाण व रिना पवार या दोघींच्या घरचे पत्ते मिळाले. यावर पोलिसांनी वरील दोघींच्या घरावर छापा टाकून दोघीनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पूनम पडवळ व नंदा चव्हाण हिच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने चेतन ज्वेलर्स या सराफाच्या दुकानातून चोरी केल्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com