भाजपला गुंडांचं येड लागलंय... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पुणे - ""भाजपला गुंडांचं येड लागलं आहे. अंतर्गत कलहामुळे पक्ष मोडकळीला आला आहे. पक्ष भंगारात जाण्याची वेळ आली आहे. स्वत:च्या बुडाखाली काय जळते आहे, त्याकडे त्यांनी आधी लक्ष द्यावे,'' असा जळजळीत सल्ला बुधवारी शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपला दिला. "महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही,' असा विश्‍वास व्यक्त करताना "निवडणुकीनंतरही भाजपबरोबर जाणार नाही,' असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. 

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून आज वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्या वेळी शिवसेनेने भाजपवर तोफ डागली. दोन दिवसांपूर्वी सिंहगडावर भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. त्या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेने शहराचे वातावरण प्रदूषित केले आहे, अशी टीका केली होती. त्यावर शिवसेनेने या शब्दात भाजपला आज प्रतिउत्तर दिले. शिवसेनेला चांगले दिवस आहेत. त्यामुळे शहरात सर्वाधिक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत, असा दावाही यावेळी पक्षाकडून करण्यात आला. निवडणुकीत सकारात्मक प्रचारावरच पक्षाचा भर राहणार असून, प्रभागनिहाय आमचा विरोध असणार आहे, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. 

भाजपला गुन्हेगारांचे येड लागले आहे. त्यामुळे पुणेकर त्यापासून सावध झाल्याशिवाय राहणार नाहीत,' असे सांगून विनायक राऊत आणि डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ""उमेदवारी वाटपावरून अन्य पक्षांच्या तुलनेत फार गोंधळ झालेला नाही. बाहेरून आलेल्या दहाच लोकांना उमेदवारी देण्यात आली. निष्ठावंतांना जास्त तिकीट देण्यात आली आहेत. या उलट भाजपमध्ये पक्षाच्या शहराध्यक्षांच्या फोटोला काळे फासण्यात आले. राष्ट्रीय पक्षाचा टेंभा मिरविणाऱ्या पक्षाने क्षेत्रीय कार्यालयात काय गोंधळ घातला, हे पुणेकर विसरणार नाहीत. पारदर्शकतेचा आग्रह धरणाऱ्यांनी प्रथम स्वत:चे आत्मपरीक्षण करावे,'' असा टोलाही डॉ. अमोल कोल्हे यांनी या वेळी लगावला.

Web Title: gangsters in BJP party