सांगवी परिसरात गणेशमुर्ती बनविण्याची लगबग

रमेश मोरे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी (पुणे): एक महिन्यावर आलेल्या गणेश उत्सवामुळे जुनी सांगवी व परिसरातील गणेशमुर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमधुन कारागीर मंडळींची लगबग सुरू आहे. जुनी सांगवीतील कुंभारवाड्यातील श्रीं च्या मुर्तीस सांगवीसह शहरात मोठी पसंती आहे. सांगवीत येथे सर्व प्रकारच्या मुर्त्या कलाकार तयार करतात.प्लँस्टर पँरीस मुर्त्यांना जास्त मागणी असली तरी शाडु मातीच्या मुर्त्यांनाही सध्या मागणी वाढत आहे.

जुनी सांगवी (पुणे): एक महिन्यावर आलेल्या गणेश उत्सवामुळे जुनी सांगवी व परिसरातील गणेशमुर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमधुन कारागीर मंडळींची लगबग सुरू आहे. जुनी सांगवीतील कुंभारवाड्यातील श्रीं च्या मुर्तीस सांगवीसह शहरात मोठी पसंती आहे. सांगवीत येथे सर्व प्रकारच्या मुर्त्या कलाकार तयार करतात.प्लँस्टर पँरीस मुर्त्यांना जास्त मागणी असली तरी शाडु मातीच्या मुर्त्यांनाही सध्या मागणी वाढत आहे.

अनेक सार्वजनिक मंडळे,घरगुती गणेश उत्सवसाठी हव्या तशा गणेश मुर्त्यांसाठी ऑर्डर देण्यासाठी कुंभारवाड्यात वर्दळ सुरू आहे. दर वर्षी वेगवगळ्या संकल्पनेतील मुर्तींना विशेष मागणी असते. या वर्षी विठ्ठलाच्या रूपातील "माऊली" या नावाने साकारलेली मुर्ती बाजारपेठेचे आकर्षण ठरत आहे. फेटाधारी जय मल्हार, जय हनुमान, बाहुबली, बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार अशा गणेश मुर्तींना बच्चे कंपनीकडून घरगुती गणेश उत्सवासाठी विशेष मागणी असते. सध्या कच्चा माल, जीएसटी, इंधन दरवाढीचा परिणाम मुर्तीकामावर वाढल्याने प्लँस्टर ऑफ पँरिसची १० ईंच उंचीची मुर्ती तीनशे रूपये तर सहाशे ते सातशे रूपये शाडू मातीच्या मुर्तीचे किमान दर राहणार आहेत.

जुनी सांगवीतील कुंभारवाड्यात श्रींच्या आकर्षक, विविधरूपातील मूर्ती तयार करण्यात येतात. सध्या बाबू गेनू, जिलब्या मारुती, तुळशीबाग, कसबा, दगडूशेठ, मंडई, लालबागचा गणपती अशा तयार आकर्षक मुर्ती येथे पहावयास मिळतात.

नविन ताम्ररंगातील गणेश मुर्तीचा प्रयोग- सध्या बाजारात आलेल्या कॉपर (तांम्र रंग) प्रथमच गणेशमुर्तीला दिल्याने गणेश मुर्तीचे वेगळेपण पहायला मिळत आहे. तांम्र रंगसंगतीमुळे मुर्तीला उठावदारपणा आला आहे. कॉपर रंगातील या मुर्ती १० इंचापासुन पुढे उपलब्ध आहेत. सोनेरी फायबर गोल्डची रंगसंगती- बाजारात पहिल्यांदाच आलेला सोनेरी फायबर गोल्ड रंगसंगतीमुळे मुर्त्यांचा दागिने, मुकुट आता अस्सल सोनेरी दिसु लागला आहे.फायबर गोल्ड सोनेरी रंगाच्या अविष्कारामुळे यावर्षी गणेशमुर्त्या आधिक आकर्षक झाल्या आहेत. कारागीर मागणीनुसार कलाकृती करून देताना कलाकार सध्या रमलेले दिसतात.

सर्वसामान्यांना परवडणा-या प्लँस्टर ऑफ पँरीसच्या मुर्त्यांना जास्त मागणी असल्याने कारखान्यातून शाडू मातीच्या तुलनेत प्लँस्टर पँरीसच्या मुर्त्या आधिक दिसतात.

यावर्षी आमच्याकडे विविधरूपातील गणेशमुर्ती उपलब्ध आहेत. नव्याने कॉपर रंग,फायबर गोल्ड रंगाचा वापर केल्याने मुर्ती आधिक आकर्षक झाल्या आहेत. रंग, कच्चामाल, इंधन दरवाढ, वाहतूक खर्चामुळे यावर्षी मुर्ती दरात पन्नास ते शंभर रूपयाने वाढ झाली आहे. हा आमचा पिढीजात व्यवसाय असून, लोकांच्या मागणीनुसार मुर्ती बनवुन दिली जाते.
- कपिल कुंभार, जुनी सांगवी.

Web Title: ganpati idol and sangvi area