पाच घाटांवर निर्माल्यसंकलन

सिद्धेश्वर-वृद्धेश्वर घाट - सकाळ सोशल फाउंडेशन आयोजित निर्माल्यसंकलन उपक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी पीडीसीसी बॅंक व रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडाचे अधिकारी व कर्मचारी. सोबत विद्यार्थी स्वयंसेवक.
सिद्धेश्वर-वृद्धेश्वर घाट - सकाळ सोशल फाउंडेशन आयोजित निर्माल्यसंकलन उपक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी पीडीसीसी बॅंक व रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडाचे अधिकारी व कर्मचारी. सोबत विद्यार्थी स्वयंसेवक.

पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांच्या वतीने आणि रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडा यांच्या सहकार्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील प्रमुख पाच विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्यसंकलन मोहीम राबविण्यात आली.

मुठा नदीवरील सिद्धेश्वर-वृद्धेश्वर घाट, भिडे पूल, पांचाळेश्वर घाट, एस. एम. जोशी पूल (नदीकडील दोन्ही बाजू) या प्रमुख पाच घाटांवर निर्माल्यसंकलन करून जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमाची सुरवात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, कार्यलक्षी संचालक रवींद्र जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडाच्या अध्यक्षा अनिता पाटील, प्रदीप पाटील, डॉ. समीर शास्त्री, बॅंकेचे उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, सहायक सरव्यवस्थापक समीर राजपूत, अभिजित हेगडे, विभागप्रमुख नियोजन व विकास सचिन दोरगे व कर्मचारी उपस्थित होते.

पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी, विद्यार्थी सहायक समितीचे आणि सकाळ-निर्धारचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. दरम्यान, पुण्यातील सर्व विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवकाळात ८ लाख ८३ हजार ७३ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com