Video : पुण्यातील टिळक चौक रिकामा; मिरवणूक संपली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

सकाळी सात वाजता दगडूशेठ गणपती मंडळ टिळक चौकातून पुढे गेल्यानंतर स्पीकर बंद करण्यात आले होते. त्यामुळे गणपती बाप्पा मोरयाचा जयगोष करीत मंडळे पुढे जात आहेत. तर स्पीकर बंद केला म्हनुन मंडळाचे कार्यकर्ते चिडले होते. मात्र एलईडी लाईटचा झगमगाट सुरू होता. 

पुणे : शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास टिळक चौकातील मिरवणूक संपली. मात्र सकाळी आठनंतरत मिरवणुकीचा वेग मंदावला आहे. अजूनही अनेक मंडळी संभाजी पूल आणि जंगली महाराज रस्त्यावर ते थांबलेली आहेत.

सकाळी सात वाजता दगडूशेठ गणपती मंडळ टिळक चौकातून पुढे गेल्यानंतर स्पीकर बंद करण्यात आले होते. त्यामुळे गणपती बाप्पा मोरयाचा जयगोष करीत मंडळे पुढे जात आहेत. तर स्पीकर बंद केला म्हनुन मंडळाचे कार्यकर्ते चिडले होते. मात्र एलईडी लाईटचा झगमगाट सुरू होता. 

भाऊ रंगारी मंडळ साडेपाच वाजता चौकातून पुढे गेले. मंडई गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे सकाळी सात वाजता व त्यानंतर दगडूशेठ गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन सकाळी आठ वाजता पांचाळेश्वर विसर्जन घाटावर विसर्जन झाले.

खंडोजी बाबा चौकात सकाळी साडेसहा पासून आतापर्यंत एकूण 74 मंडळे दाखल झाली. काल पासून एकूण 200  गणेश मंडळ या ठिकाणाहून मार्गस्थ झाली. तर नटेश्वर विसर्जन घाटावर आतापर्यत 60 मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले त्यातील 3 मानाचे गणपती होते.

हलगी व पीपाणीचा आवाज : 
अलका चौकात सकाळी सातनंतर पोलिसांनी स्पीकर लावण्यास बंदी केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पिपाणी वाजवत हलगीवर ठेका धरला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpati visarjan rally stops at Tilak Chauk