शिरूर तालुक्यात गणपती विसर्जन शांततेत (व्हिडिओ)

युनूस तांबोळी
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी (ता. 23) संध्याकाळी चार नंतर गावागावातील मंडळानी श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीस प्रारंभ झाला. पालखी, दिंडी सोहळा, पारंपारीक कलश घेऊन महिलांचा सहभाग, विविध स्पर्धांचे आयोजन करत शांततेच मिरवणूक पार पडली.

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी (ता. 23) संध्याकाळी चार नंतर गावागावातील मंडळानी श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीस प्रारंभ झाला. पालखी, दिंडी सोहळा, पारंपारीक कलश घेऊन महिलांचा सहभाग, विविध स्पर्धांचे आयोजन करत शांततेच मिरवणूक पार पडली.

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील त्रीमुर्ती मित्र मंडळाने विसर्जन मिरवणूकीत महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. वडनेर (ता. शिरूर) येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एकामागून एक गणेश मंडळांची विर्सजन मिरवणूक निघाली होती. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन या मिरवणूक सोहळ्यात बाप्पा मोरया चा जयघोष केला. जांबूत (ता. शिरूर) या परीसराती शेजारच्या कावळपिंपरी गावात विर्सजन मिरवणूकीसाठी गेलेली तिन मुले तलावात बुडाल्याची घटना घडल्याने येथे लवकरच विसर्जन मिरवणूक आटोपण्यात आली. शांततेत पार पडलेल्या मिरवणूकीत मुलांना पाण्यात सोडू नका असे आवाहन पोलीस कर्मचारी बाळकृष्ण साबळे, प्रकाश कोकरे व संजय साळवे यांनी केले. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे विसर्जन मिरवणूकीत ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. या विसर्जन मिरवणूकीला आठवडे बाजाराचा अडथळा येत होता. त्यावेळी ग्रामस्थांनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आवाहन करत बाजार बंद ठेवण्यात आला.

कवठे येमाई (ता. शिरूर) येथे विविध मंडळानी विसर्जन मिरवणूकीत भाग घेतला होता. नवज्योत मित्र मंडळाने दारूबंदीवर पथनाट्य सादर केले. गुरूदेव दत्त फ्रेंडसिप गणेश मंडळाने पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी विसर्जन मिरवणूकीत खो खो ची स्पर्धेने चांगलीच रंगत चढवली होती. ग्रामस्थांनी सर्व मंडळाचे स्वागत करत विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

Web Title: ganpati visarjan at shirur taluka