पुणे : सुखसागरनगरमध्ये गॅरेजच्या साहित्यास आग; अन् असा टळला धोका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सुखसागरनगरमधील एका गॅरेजमधील साहित्यास मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना आज (ता.22) पहाटे घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वेळीच आग आटोक्यात आणली आहे. 

पुणे : सुखसागरनगरमधील एका गॅरेजमधील साहित्यास मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना आज (ता.22) पहाटे घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वेळीच आग आटोक्यात आणली आहे. 

आज पहाटे पाच वाजता सुखसागनगरमध्ये अप्पर कोंढवा बुद्रुक परिसरातील  काकडेवस्ती, सर्वे नं. ६७, येथील कुमावत ऐटोमोटिव्ह कार्स गॅरेज मधील सर्व साहित्यास अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली होती.  कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी त्वरित तेथील ऑइलचे दोन बॅरल आगीपासून दूर केल्याने मोठा धोका टळला.  

जवानांनी वेळीच प्रसंगवधान राखून शेजारील पार्किंगमधील चारचाकी वाहनांपर्यंत आग पोहोचून आणखी मोठे नुकसान झाले असते. जवानांनी आगीवर वेळीच नियंत्रण करून आग पूर्णपणे शमविली आहे. केंद्रप्रमुख प्रकाश गोरे, फायरमन गणपत पडये, सोपान कांबळे तर देवदूत चौखंडे, बामगुडे, खेडेकर यांचा सहभाग होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garage materials fire in Sukhsagar Nagar at pune