#GarbageDumping पुण्यात कचऱ्याचे साम्राज्य..!

Pune-Garbage Issue
Pune-Garbage Issue

पुणे शहरासह उपनगरांत कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक ठिकाणी कचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. यावर टाकलेला प्रकाशझोत...

एरंडवणे
 किष्किंधानगर, सुतारदरा परिसरात कचऱ्याचे ढिसाळ व्यवस्थापन 
 बावधनमधील बायोगॅस प्रकल्पाचा हवा तसा वापर नाही 
 कचरा वर्गीकरणाचाही प्रश्न गंभीर

शिवणे, उत्तमनगर, वारजे माळवाडी
 शिवणे, उत्तमनगर, वारजे माळवाडी परिसरात कचऱ्याचे ढीग
 रस्त्यालगत कचराकुंडीजवळ कचरा
 शिवणे आणि उत्तमनगर या दोन्ही गावच्या स्मशानभूमीजवळ कचरा

खडकवासला
 कचरा गोळा करणे आणि विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदाराला महिन्याला लाखो रुपये 
 किरकटवाडीतील ओढ्याबरोबर केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग
 कचरा रिकाम्या जागेवर नेऊन डंपिंग केला जातो
 ५ हजारांपेक्षा जास्त घरे असलेल्या गावाला ठेकेदाराला दर महिन्याला दोन ते तीन लाखो रुपये

धायरी 
 धायरी, समाविष्ट धायरी गाव, वडगाव बु, वडगाव खुर्द, अंतर्गत रस्ते, महामार्गाशेजारील सेवारस्त्यावर कचऱ्याचे ढीग 
 परिसरात कचरा जाळण्याचे प्रमाण अधिक  
 धायरी आणि वडगाव येथे दोन डंपिंग ग्राउंड 
 महापालिकेकडे वर्गीकरणासाठी पुरेसे कर्मचारी वर्ग असून देखील व्यवस्थापन होत नाही 

सिंहगड रस्ता 
 आनंदनगर, माणिकबाग, सनसिटी रस्ता, हिंगणे, दत्तवाडी भागात ठिकठिकाणी कचरा व काही ठिकाणी कचरा प्रकल्प   
 माणिकबाग येथे क्‍लीन गारबेज मॅनेजमेंट संस्थेतर्फे सुक्‍या कचऱ्यापासून विविध उत्पादनाची निर्मिती  
 महापालिकेतर्फे बायोगॅस प्रकल्प; मात्र २० ते २५ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया

गोखलेनगर 
 शिवाजीनगर घोले रस्ता येथील कचरा डेपोत कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती 
  गोलंदाज चौक, रोकडोबा, कामगार पुतळा, पाटील झोपडपट्टी, मुळा रोड, एफसी कॉलेज, गोखलेनगर, वडारवाडी, पांडवनगर भागांतून कचरा गोळा

औंध 
 कचरा संकलन, विलगीकरण थेट पदपथावरच
 प्रभागांत कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्‍न गंभीर 
 ॲलोमा काउंटी, डॉ. आंबेडकर वस्तीमागील भाग, आयटीआय रस्ता व गावठाणातील उड्डाण पुलाजवळ कचरा
 कचरा प्रक्रियेसाठी अलोमा काउंटीसमोरील पालिकेच्या पाणी प्रक्रिया केंद्रात पाच गुंठ्यांची जागा

वडगाव शेरी
 वडगाव शेरीतील कचरा व्यवस्थापनात त्रुटी
 बायोगॅस प्रकल्पात रोज साडेतीन ते चार टन कचरा जिरवला जातो. 
 बायोगॅसवर चालणारे विद्युतनिर्मिती यंत्र नादुरुस्त 
 तिन्ही प्रभागांत झाडन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता 
 दररोजचा ओला आणि सुका १५० टन

घोरपडी
 सेंट पॅट्रिक टाउनमध्ये महापालिका आणि पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो
 बोर्डाकडून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून गांडूळ खत बनवले जाते
 लाखो रुपये खर्च करून बनवलेला बायोगॅस प्रकल्प मात्र बंद  
 घोरपडी गाव आणि बी. टी. कवडे रस्त्यावर खुल्या जागेत कचऱ्याचे ढीग
 कचरा डेपो वस्तीतून बाहेर हलविण्याची नागरिकांची मागणी

हडपसर
 रस्त्याकडेला कचऱ्याचे साम्राज्य
 कचराकुंड्या वाहताहेत भरून
 हडपसर व रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा प्रकल्प बंद
 महापालिकेचे कर्मचारी जाळताहेत उघड्यावर कचरा 
 जुन्या व नवीन कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा
 कचऱ्यावर मोकाट जनावरांचा वावर

सहकारनगर
 लक्ष्मीनगरमध्ये रस्त्यावरच कचऱ्याचे कंटेनर 
 महात्मा फुले वसाहत, शाहू वसाहत येथे कचऱ्याचे ढीग
 भटकी जनावरे कचरा रस्त्यावर पसरवतात

कात्रज
 आंबेगाव-कात्रज घाटातील वाड्यांच्या कचरा संकलनात अपयश
 ग्रामपंचायत हद्दीतील कचरा प्रश्‍न कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com