वाघोलीतील सर्वत्र कचऱ्याचे ढीग

wagholi
wagholi

वाघोली - वाघोलीतील कचरा सध्या उचलला जात नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पूर्वी ज्या ठिकाणी कचरा डेपो होता त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या युनिटचे काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान हा कचरा शासकीय खाणीत टाकण्याचे नियोजन ग्रामपंचायत करीत आहे. मात्र केवळ चार ते पाच नागरिक त्याला विरोध करीत आहेत. या पाच जणांसाठी लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात घालणार का असा सवाल नागरिक व नेटिझन्स कडून उपस्तीत केला जात आहे.

कचऱ्यावरील प्रक्रिया करणारे युनिट उभारण्यासाठी एका संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला कोणता ही निधी खर्च करावा लागणार नाही. या युनिटचे काम सूरु झाल्याने सध्या कचरा कोठे टाकायचा असा प्रश्न ग्रामपंचायती समोर उभा आहे. त्यामुळे गेले काही दिवसांपासून कचरा उचलला गेला नाही. परिणामतः सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करीत आहे. कचरा शासकीय खाणीत टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. केवळ दोन महिने तिकडे कचरा टाकावा लागणार आहे.मात्र चार पाच नागरिकांनी त्याला विरोध केला. दरम्यान या कचऱ्यामुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचऱ्याचे फोटो सोशल मीडिया वर टाकून सुंदर वाघोली बघा असा उल्लेख केला जात आहे. केवळ चार पाच लोकांसाठी लाखोंचे आरोग्य धोक्यात घालू नये अशी अपेक्षा नागरिक व सोसायटी धारक व्यक्त करीत आहेत.

याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे विरोध करतात त्याच्याशी चर्चा सुरूच आहे. शनिवारी सदस्यांची मासिक बैठक असून त्यातही हा विषय प्राधान्याने घेण्यात येईल. 
- वसुंधरा उबाळे, सरपंच वाघोली.

शासकीय खाणीत कचरा टाकण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र काही जण विरोध करीत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू.लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्याचे गांभीर्य ग्रामपंचायतीला आहे.
- संदीप सातव, उपसरपंच, वाघोली

लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. फक्त दोन महिने कचरा तिकडे टाकावा लागणार आहे. काहींचा विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोध करणार्यांनी लाखो लोकांच्या आरोग्याचा विचार करावा. 
- रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com