सोमनाथनगरमध्ये घाणीचे साम्राज्य

राडारोडा पडलेला आहे तो कधी उचलणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
pune
punesakal

वडगावशेरी : सोमनाथनगर वडगावशेरी येथे पुणे महानगरपालिकेच्या सबंधित विभागा कडून पिण्याच्या पाण्याची जलवाहिन्याची कामे पुर्ण करण्यात आली त्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. परंतु जो राडारोडा पडलेला आहे तो कधी उचलणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. (Pune News)

सध्या पावसाचे दिवस सुरू आहे. नेहमीच गजबजलेल्या या परिसरात पादचाऱ्यांसह वाहनांची ये जा सुरू असते. जलवाहिन्यांची कामांसाठी रस्ता खोदण्यात आला होता. जलवाहिन्यांची कामे पुर्ण झाली आहे. खोदण्यात आलेल्या रस्त्याचा राडारोडा हा कित्येक दिवसांपासुन पडलेला आहे. तो लवकरात लवकर हटवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रस्त्यावरील वळणांवर राडारोडा टाकण्यात आल्याने या ठिकाणी एखाद्या दुचाकी चालकाचा तोल जाऊन अपघात होऊ शकतो. लवकरात लवकर हा राडारोडा उचला जावा अशी मागणी स्थानिक रहिवासी सुरेखा घनवट सह नागरिकांकडून करण्यात आली आहे.

pune
'देशात पॉर्न पाहण्याचं कारणं सनी लिओनी, तिच्यावर कारवाई का नाही?'

सबंधित विभागा कडून सदर ठिकाणचा राडारोडा लवकरात लवकर उचलण्यात येईल.

-मधुकर थोरात, उपअभियंता,बंडगार्डन पाणी पुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com