औद्योगिक वसाहतीत जाळला जातोय कचरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

हडपसर: रामटेकडी औद्योगिक वसाहतीत उघड्यावर कचरा टाकून तो जाळण्यात येत आहे; तसेच परिसरातील मोकळ्या जागेत राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला जात असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दररोज कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे या भागातील कंपनीमधील कामगारांनी सांगितले. खासगी बांधकाम व्यावसायिक खोदकामातील राडारोडा रात्रीच्या वेळी या ठिकाणी आणून टाकतात. यामुळे राडारोड्याचे ढीग साचले आहेत. एका विद्युत वाहिनीला टेकण्यापर्यंत या राडारोड्याचा ढीग आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

याबाबत रामटेकडी-मुंढवा सहायक आयुक्त कार्यालयाचे सहायक आयुक्त संजय गावडे म्हणाले, ""या भागाची तातडीने पाहणी करून कचरा हटविण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जातील. या ठिकाणी कचरा व राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.''

Web Title: Garbage in industrial colon is burnt