नव्या कचरागाड्या येऊनही नियोजनाअभावी सांगवीत कचरा रस्त्यावर

sanvagi
sanvagi

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेकडून १ जुलै पासून पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाकडे कचरा संकलनासाठी जुन्या गाड्याऐवेजी प्रभागात नव्या गाड्या दिल्या. मात्र नियोजनाअभावी गेली चार दिवसांपासून जुनी सांगवीत घंटागाड्या फिरल्या नसल्याने परिणामी घरातील तुंबलेला कचरा नागरीकांनी रस्त्यावर टाकल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.


नव्या गाड्या येवूनही नियोजनाअभावी कचरा रस्त्यावर जागोजागी तुंबला आहे. कचराकुंड्यांजवळ मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने कचरा रस्त्यावर आलाआहे. नागरिक, शाळकरी मुले यांना पावसाच्या दिवसात दुर्गंधीचा सामना करत मार्गक्रमण करावे लागत आहे. संबंधित ठेकेदारांकडे तुटपुंजी यंत्रणा असल्याने गेली तीन चार दिवसांपासून तुंबलेला कचरा उचलण्यात आलेला नाही तर, ओला-सुका कचरा वेगळा करण्याबाबत व संकलन करून वजन करण्यासाठी ऑपरेटर उपलब्ध नाहीत. कंटेनर ड्रायव्हर (ऑपरेटर) उपलब्ध नाहीत. रस्त्यावर आलेला कचरा उचलण्यात धांदल उडाली असल्याचे चित्र आरोग्य विभागाकडून पाहायला मिळते प्रत्यक्षात मात्र काम होत नाही. परिणामी, वेळीच कचरा गाड्या गल्ल्यांमधून न फिरल्यास तुंबलेला कचरा पून्हा रस्त्यावर येणार आहे.

याबाबत मनसेचे राजू सावळे यांनी  क्षेत्रीय कार्यालयात कचऱ्याचा प्रश्न व्यवस्थित मार्गी लावण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. येत्या दोन-तीन दिवसात कचरा व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास मनसे कडून पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर कचरा आणून टाकण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर राजू सावळे,सुरेश सकट, सतीश मटपरती, दिलीप ठोंबरे, प्रदीप गायकवाड आदींच्या सह्या आहेत याबाबत ह क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. तर सांगवी आरोग्य विभागाच्यावतीने काम सुरू  असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com