'घर दुसरीकडे मिळेलही, पण काम गेले तर...'

ck.jpg
ck.jpg

पुणे : तुम्ही कचरावेचक आहात, तुमच्या माध्यमातुन कोरोना आमच्यापर्यंत येईल, त्यामुळे तुम्ही काम सोडा, नाहीतर घर, कचरावेचक अंजना घोडके यांना त्यांच्या घरमालकाने असे दोन पर्याय दिले. शेवटी त्यांनी घर सोडण्याचा पर्याय निवडला आणि  कचरा वेचण्याचे काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

कचरावेचकांना अशा अनेक चांगल्या-वाईट अनुभवांना सध्या सामोरे जावे लागत आहे. त्यातच कोरोनामुळे नागरीक कचरा उचलण्याचे पैसे (यूजर फी) ही देण्यास नकार देऊ लागल्याने "सांगा आम्ही जगायचे कसे" असा प्रश्न कचरावेचक उपस्थित करु लागले आहेत.

अंजनाताई मागील 4-5 वर्षापासून "स्वच्छ" या संस्थामध्ये हडपसर भागात घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे काम करतात. त्यांच्या कामामुळे कदाचित त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याचा फटका आपल्यालाही बसेल, या उद्देशाने त्यांच्या घरमालकाने त्यांना निर्णय घ्यायला सांगितला. अंजनाताई सांगत होत्या, "घर दुसरीकडे मिळेलही, पण काम केले नाही, तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा ? शेवटी घर सोडायचे ठरवले, आत्ता मुलीकडे राहतेय, थोड्या दिवसांनी ते घर सोडू"

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अंजनाताईप्रमाणे हजारो कचरावेचक कोरोनामुळे जीवला भिती असतानाही त्याची पर्वा न करता कचरा उचलण्याचे काम करीत आहेत. हे काम करत असतानाच त्यांना अंजनाताईसारख्या अनेक प्रश्नाना दररोज तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्यात आणखी एका प्रश्नाने डोके वर काढले आहे. कचरावेचकांना कचरा उचलण्यासाठी एका घरामागे दरमहा मिळणारी "यूजर फी " झोपडपट्टी परीसरातुन मिळत नसल्याची सद्यस्थीती आहे.

"स्वच्छ"च्या कचरावेचकांना ते कचरा उचलत असल्याच्या कामापोटी प्रत्येक घर किंवा हॉटेल, रेस्टोरंट अशा मालमत्तामधुन दरमहा 70 रूपये मिळतात. तर झोपडपट्टीत एका घरामागे 45 रूपये मिळतात. मात्र कोरोनामुळे झोपडीपट्टीतील बहुतांश कष्टकरी वर्गाच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्याकडुन कचरावेचकांना पैसे देण्यास असमर्थता दर्शवित असल्याचे अनुभव कचरावेचकांना मिळत आहेत. काही कचरावेचकांकडे पूर्णपणे झोपडपट्टी परिसर येत असल्याने त्यांना दरमहा मिळणारे पैसेही मिळत नाहीत, त्यामुळे "काम केल्याचे पैसेच मिळत नसतील तर जगायचे कसे, असे प्रश्न कचरावेचक उपस्थित करीत आहेत.


* कचरावेचकांची एकूण संख्या - तीन हजार 500
* कचरा गोळा करण्यात येणाऱ्या घरासह मालमत्ताची संख्या - 8 लाख
* झोपडपट्टीध्ये कचरा गोळा करण्यात येणाऱ्या घरांची संख्या - दिड लाख ( 8 लाखापैकी)
* झोपडपट्टीतील एका घरामागे दरमहा मिळनारे पैसे - 45 रुपये
* सोसायटया व अन्य मालमत्तामधून दरमहा मिळनारे पैसे - 70 रूपये
इंद्रायणी घाटावर गुंडांची दहशत; रात्रीच्या काळोखात लुटतायेत नागरिकांना

कचरावेचकांच्या समस्या
* बससेवा नसल्याने घर ते कामाच्या ठिकाणापर्यन्त 2-3 किलोमीटर पायी जावे लागणे
* 60-100 किलो वजन ढकलगाडीतुन 1-2 किलोमीटर पर्यंतच्या फिडर पॉइंटवर घेऊन जाणे
* यूजर फी व रिसायकलींगमधुन ही पैसे मिळत नसल्याने उदरनिर्वाह भागविणे अवघड
* रेशन मिळण्याची अडचण असल्याने खाण्या-पिण्याची आबाळ 

"स्वच्छ"कडुन केल्या जाणाऱ्या उपाययोजना
* कचरावेचकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांची वैदकिय तपासणी करणे
* मास्क, सैनीटायझर, फेसशिल्ड, साबण अशा वस्तुंचे वाटप
* विविध घटकांच्या मदतीने रेशन किट उपलब्ध करुन देणे
* कचरावेचकांना अल्प प्रमाणत आर्थिक आधार देणे

"कचरावेचक असल्याने कोरोना होईल, या भितीमुळे आमच्या एका कचरावेचकाला तिचे भाडयाचे घर सोडावे लागले आहे. कचरावेचक आपल्या जिवाची पर्वा न करता शहराचे आरोग्य सुधरवित आहे. असे असतानाही, कचरावेचकांना ते कचरा उचलत असलेल्या ठिकाणी "यूजर फी" दिली जात नाही.हा  प्रश्न झोपडपट्टीमध्ये जास्त आहे." -सुचिस्मिता पै, जनसंपर्क अधिकारी, स्वच्छ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com