कचरा साचलायं का? मग अधिकाऱ्यांना कॉल करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

तुमच्या परिसरात की गृहनिर्माण संस्थांमध्ये ई- कचरा ( E-waste) साचलायं का? मग विचार काय करताय. महापालिकेच्या सहाय्यक क्षेत्रिय अधिकाऱ्यांना फोन करा आणि कचरा उचण्यास सांगा. कारण आता "ऑन कॉल' या तत्वावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने आजपासून (ता.5) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पिंपरी - तुमच्या परिसरात की गृहनिर्माण संस्थांमध्ये ई- कचरा ( E-waste) साचलायं का? मग विचार काय करताय. महापालिकेच्या सहाय्यक क्षेत्रिय अधिकाऱ्यांना फोन करा आणि कचरा उचण्यास सांगा. कारण आता "ऑन कॉल' या तत्वावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने आजपासून (ता.5) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात कचरा संकलन व वाहतुकीचे कामकाजाकरता जुलै महिन्यापासून ए. जी. इन्हायरो इन्फ्रा प्रोजेक्‍टस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला शहरातील दक्षिण विभागाकरता जबाबदारी दिली आहे. तर बी. व्ही. जी इंडिया या संस्थेवर शहराच्या उत्तर भागाकरता नियुक्ती केली आहे. या दोन्हीही संस्थांकडून घरोघरचा कचरा गोळा करण्यात येत आहे.

त्याचबरोबरच ई - कचरा संकलनाची देखील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र वाहनदेखील दिली आहे. पण आता या दोन्ही संस्थाबरोबरच महापालिकेच्या आठ क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आरोग्यअधिकाऱ्यांनादेखील काम दिले आहे. ऑन कॉल' या तत्वावर ही सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी या अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर शहरातील नागरीकांनी कचरा उचलण्याची मागणी करायची आहे.

त्यावर तात्काळ त्या परिसरात कचरा उचलण्यासाठी वाहने पाठवून कचरा उचलण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे. 

यांना करा कॉल 
सहाय्यक आरोग्य अधिकारी/ क्षेत्रिय कार्यालय / भ्रमणध्वनी क्रमांक 

एम. ए. शिंदे/ अ / 9922501914 
के. डी. दरवडे / ब / 9922501898 
बी. बी. कांबळे/ क / 9922501869 
व्ही. के. बेंडाळे/ ड / 9922501 877 
आर. एम. भाट / इ / 9922501882 
डी. जे. शिर्के / फ / 9922501876 
एस. एस. कुलकंर्णी/ ग / 9922501875 
डी. एस. सासवडकर / ह / 9922501896 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garbage pollution officer calling