चंदननगर, खराडी, वडगावशेरी भागात कचर्‍याची समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्याच्याकडेला पडलेला कचरा.

चंदननगर, खराडी, वडगावशेरी भागात कचर्‍याची समस्या

रामवाडी - चंदननगर खराडी वडगावशेरी भागात काही ठिकाणी चक्क रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात राहणारे तसेच त्या भागातून ये-जा करणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा वेळेवर उचला जावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छ पुणे सुंदर पुणे ही मोहीम राबवली जात आहे. पण चंदननगर खराडी रोड मातोश्री गृहरचना सोसायट्या समोर , गलांडेनगर, जुना मुंढवा रोड, मोझेस वाडी, अशा ठिकाणी रस्त्यावर कचर्‍याचे ढीग दिसुन येत आहे. या कचर्‍याच्या उपजीविका करणारे मोकाट जनावरे कडून कचरा विखुरला जात आहे. कचर्‍यामुळे चिलटे माश्यांचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे.परिसरातील स्वच्छता वर प्रशासनाने भर दिला जावा अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.

नागरिकांकडून घरातील व शारीरिक स्वच्छता राखली जात आहे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.रात्रीच्या वेळेस काहीजण येथे कचरा आणून टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

- श्रुतिका पवार.

Web Title: Garbage Problem In Chandannagar Kharadi Wadgaon Sheri Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..