प्रक्रिया प्रकल्पांचाच ‘कचरा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

पुणे - कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे नियोजन करून महापालिकेने नव्या कचरा प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली; मात्र याआधी तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या प्रकल्पांमधून केवळ एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.बायोगॅसनिर्मितीच्या उद्देशाने पाच टन क्षमतेचे २५ प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यापैकी पाच प्रकल्पांची मुदत संपली आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही होत नाही. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी तब्बल ८ कोटी ८८ लाख ७१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहर आणि परिसरात विविध भागांत प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

पुणे - कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे नियोजन करून महापालिकेने नव्या कचरा प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली; मात्र याआधी तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या प्रकल्पांमधून केवळ एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.बायोगॅसनिर्मितीच्या उद्देशाने पाच टन क्षमतेचे २५ प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यापैकी पाच प्रकल्पांची मुदत संपली आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही होत नाही. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी तब्बल ८ कोटी ८८ लाख ७१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहर आणि परिसरात विविध भागांत प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यात, मोठ्या क्षमतेच्या म्हणजे १ हजार, सातशे, तीनशे आणि शंभर टन क्षमतेच्या सहा प्रकल्पांचा समावेश आहे. त्यांच्या उभारणीसाठी जवळपास २३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यापैकी एक हजार क्षमतेचा हंजर प्रकल्प सन २००८ आणि दिशा प्रकल्प २०१० पासून बंद आहे. तर, रोकेम प्रकल्पात क्षमतेच्या तुलनेत निम्म्याहून कमी कचऱ्यावर प्रक्रिया होते. त्यामुळे मोठ्या क्षमतेचे प्रकल्प नावापुरतेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कचराप्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढविण्यात येत आहे. जुन्या प्रकल्पांचे ‘ऑडिट’ करण्यात येईल. 
- विलास कानडे, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका

Web Title: Garbage Process Project Issue Municipal