भीमा नदीत अज्ञातांनी टाकला कचरा

दौंड - भीमा नदी पात्रात टाकण्यात येत असलेला कचरा.
दौंड - भीमा नदी पात्रात टाकण्यात येत असलेला कचरा.

दौंड - दौंड नगरपालिकेचा कचरा अज्ञात व्यक्तींनी भीमा नदीत टाकल्याचा लेखी दावा ठेकेदाराने केला आहे. शहरातील कचरा भीमा नदीकाठावरील स्मशानभूमी परिसरातील बेकायदा वीटभट्ट्यांचा विस्तार करण्यासाठी टाकण्यात आला होता. नदीकाठावरील खडकांमधील खड्डे कचऱ्याने भरून ती जागा समतल केल्यानंतर नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून तो जेसीबीच्या साह्याने थेट नदीत टाकण्याचा प्रकार समोर आला.

त्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. या प्रकरणी ठेकेदार मेसर्स नागेश्वर कन्स्ट्रक्‍शनला (पाटस, ता. दौंड) मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देताना ठेकेदाराने अज्ञात व्यक्तींकडून परस्पर भर टाकण्यासाठी कचरा नेल्याचे सांगितले. ही बाब लक्षात येताच कचरा टाकणे बंद करून टाकलेला कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू केल्याचा दावा उत्तरात नमूद करण्यात आला आहे. 

दरम्यान, नगरपालिकेच्या घंटागाड्या व कॉम्पॅक्‍ट वाहने नदीकाठी आणून त्यातील कचरा नदीत टाकण्यात आला. त्याचबरोबर जमा झालेला कचरा नदीत टाकण्यासाठी नगरपालिकेचाच जेसीबी वापरण्यात आला. त्यामुळे नगरपालिका बेजबाबदारपणे वागणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com