गर्भसंस्कार पुरस्काराच्या प्रवेशिकांसाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

पुणे - आत्मसंतुलन व्हिलेजच्या वतीने आयोजण्यात आलेल्या गर्भसंस्कार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास 28 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे - आत्मसंतुलन व्हिलेजच्या वतीने आयोजण्यात आलेल्या गर्भसंस्कार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास 28 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी "गर्भसंस्कार पुरस्कार' दिला जातो. या स्पर्धेसाठी पालकांनी, 28 जानेवारी 2016 ते 28 जानेवारी 2017 या एक वर्षात जन्म झालेल्या बालकाच्या संपूर्ण प्रगतीविषयी माहिती पाठवायची आहे. ही माहिती बाळाच्या, तसेच आई-वडिलांच्या छायाचित्रांच्या तीन प्रतींसह 28 जूनपर्यंत पाठवावी. अधिक माहितीसाठी "फॅमिली डॉक्‍टर' (8 जून) ही पुरवणी पाहावी.

ही माहिती 28 जूनपर्यंत पुढील ठिकाणी पाठविता येईल - संतुलन आयुर्वेद, आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 ; संतुलन आयुर्वेद, द आयुर्वेद स्टोअर, 1170/5, कार्तिक चेंबर्स, शिवाजीनगर, पुणे 411 005 ; संतुलन आयुर्वेद, द आयुर्वेद स्टोअर, 1 ज्योती कुटिर, आदर्श लेन, मालाड (प.), मुंबई 400 064 ; संतुलन आयुर्वेद, द आयुर्वेद स्टोअर, 11 धर्मराज प्लाझा, जुना गंगापूर नाका, डोंबिवली को-ऑप. बॅंकेजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422 005; संतुलन आयुर्वेद, सकाळ पेपर्स बिल्डिंग, शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर, 416 008.

Web Title: garbha sanskar award