प्लॅस्टिक बाटल्यांतून साकारणार उद्यान

सुवर्णा चव्हाण
गुरुवार, 27 एप्रिल 2017

विशीतल्या तरुणांचा ‘पॉकेटमनी’तून रेल्वे फलाटावर उपक्रम

पुणे - प्रवासी पूर्वी तेथे थुंकायचे, कचरा-प्लॅस्टिकच्या वस्तू फेकायचे... पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहाची ही होती परिस्थिती... पण आता ती बदलण्याचा विडा महाविद्यालयीन तरुणांनी उचलला आहे. हे तरुण या फलाटावर सुशोभित उद्यान साकारणार आहेत आणि तेही चक्क प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि टायरचा पुनर्वापर करून.

स्वतःच्या पॉकेटमनीमधून ५० फूट जागेवर तयार करण्यात येणाऱ्या या उद्यानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उद्यानाचे उद्‌घाटन रविवारी (ता. ३०) होईल.

महाविद्यालयीन तरुणांनी स्थापन केलेल्या ‘मिशन २०२०’ आणि ‘युनोया थेरपी’ या संस्थांमार्फत हे उद्यान होत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक सहावर जागा उपलब्ध केली आहे. प्लॅस्टिकपासून होणाऱ्या दुष्परिणामांची आणि प्लॅस्टिकचा वापर झाडे लावण्यासाठी कसा करता येईल, याची माहिती नागरिकांपर्यंत पोचावी, या उद्देशाने येत्या पाच दिवसांत हे छोटेखानी उद्यान तयार होणार आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे २५० प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये रोपे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये आणि चारचाकी-दुचाकींच्या टायरमध्येही रोपे लावण्यात येतील. यात ७० तरुण-तरुणींनी सहभाग घेतला आहे. या उद्यानाची संकल्पना श्रेयांस बाफना आणि ऋतिका भुरके यांची असून, हे सर्व तरुण २० वर्षांहून कमी वयाचे आहेत.

या उद्यानाला रेल्वे प्रशासन सहकार्य करत आहे. पूर्वी येथे रोपे लावली होती; पण त्यांचे योग्य व्यवस्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे हे काम तरुणांच्या हाती देण्यात आले. 
- एम. मुरली, मुख्य निरीक्षक (कमर्शिअल, पुणे विभाग), मध्य रेल्वे

Web Title: garden by plastic bottle