पिंपरीत दीडशे ठिकाणी ‘गॅस बाँब’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

बेकायदा गॅस रिफिलिंग सेंटरवर वेळोवेळी कारवाई करतो. मात्र, कंपन्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही.
- दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, अन्नधान्य पुरवठा विभाग

पिंपरी - शहरात उघड्यावर आणि नागरी वस्तीत सुमारे १५० ठिकाणी धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

नऊ एप्रिलला म्हातोबानगर-वाकड येथे स्फोट होऊन आसपासची दुकाने जळाली होती; तसेच चार वर्षांपूर्वी साने चौक-चिखलीत स्फोट झाला. त्यात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. थेरगाव येथील सोळा नंबर भागात दहा वर्षांपूर्वी गॅस रिफिलिंग करताना झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला. बेकायदा गॅस रिफिलिंग करताना दुकानचालक जखमी झाला नाही. कारण गॅसमुळे आग लागल्यास दुकानचालक पळून जातात.
 
दुकानदारांचा फायदा
घरगुती वापराचा सिलिंडर सातशे रुपयांना मिळतो. त्यावर दीडशे रुपयांपर्यंत अनुदान मिळते. म्हणजेच एक किलो गॅस सरासरी ३६ रुपयांना मिळतो. मात्र, काळ्या बाजारात त्याची किंमत १०० रुपये किलो होते. घरगुती वापराच्या एका सिलिंडरमधून पाच किलो वजनाचे तीन सिलिंडर भरले जातात. त्या वजनातही दुकानदाराकडून मापात पाप केले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas Bomb in Pimpri Dangerous