Wari 2019 : वारकऱ्यांसाठी जेवण बनविताना गॅस सिलेंडरने घेतला पेट

fire.jpg
fire.jpg

पुणे : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. हा प्रकार गुरूवारी दुपारी बारा वाजता ढोले पाटील रस्त्यावर घडला आहे.  त्यामुळे वारकऱ्यांचा गोंधळ निर्माण झाला. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्‍यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. 

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीसमवेत आलेले काही वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही ढोले पाटील रस्त्यावरील गणपती मंदिराजवळील शाळेत बुधवारी रात्री मुक्कामासाठी उतरले होते. नेहमीप्रपमाणे त्यांच्याकडील सिलेंडरवर नाष्ता तयार करण्यात आला. वारकऱ्यांचा नाष्ता झाल्यानंतर काही वारकरी दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक करायला लागले. त्यावेळी सिलेंडर सुरू करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यानंतर आग हळूहळू वाढु लागली. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये घबराट निर्माण होऊन त्यांचा गोंधळ उडाला. 

दरम्यान अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रास याबाबत माहिती देण्यात आले, त्यानंतर अवघ्या काही मिनिंटातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गॅस सिलेंडरने रेग्युलेटरच्या ठिकाणी पेट घेतलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा करुन आग तत्काळ विझविली. अग्निशामक दलाच्या नायडू अग्निशमन केंद्राचे अधिकारी विजय भिलारे, वाहन चालक सतिश श्रीसुंदर, तांडेल विजय चौरे, जवान गणेश कुंभार, भालचंद्र गव्हाणकर व देवदूत जवान अमृत रुपनर, दिपक कोकरे, किशोर गाडे यांच्या पथकाने आग विझविली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com