अवसरीत भरवस्तीत पेटला गॅस सिलिंडर (व्हिडिओ)

Gas-Cylinder-Fire
Gas-Cylinder-Fire

पारगाव - अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे आज सकाळी सिलिंडरची टाकी बदलल्यानंतर काही मिनिटांतच गॅस गळती झाली आणि घरात आगीचे लोळ पसरले. काही तरुणांनी सिलिंडरची पेटती टाकी लोखंडी गजाने दूर शेतात नेऊन त्यावर वाळू, माती व पाणी टाकून आग विझविल्याने दुर्घटना टळली. या आगीत कोणालाही दुखापत झाली नसली तरी घरातील वस्तू, कपडे, घराच्या छताचे लाकडी वासे, इलेक्‍ट्रीक वस्तू जळाल्या.

dist. today page 1 la news ghetali aahe, tyacha video

अवसरीत एका वृद्ध महिलेच्या घरातील गॅस संपल्यानंतर शेजारील तरुणाने गॅस सिलिंडरची नवीन टाकी जोडून दिली आणि तो निघून गेला. सिलिंडर चालू करून ती महिला चहासाठी पाणी आणण्यास घराबाहेर आली. परत येताच घरात सर्वत्र आगीचे लोळ दिसू लागले. त्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारील तरुण जमा झाले. त्या वेळी सिलिंडरच्या टाकीनेही पेट घेतला होता. तरुणांनी प्रसंगावधान राखत लोखंडी गजाने पेटती टाकी घराबाहेर ओढून दूर शेतात नेली. त्यावर वाळू, माती व पाणी टाकून आग आटोक्‍यात आणली. दुर्दैवाने टाकीचा स्फोट झाला असता तर आजूबाजूला मोठी लोकवस्ती होती. सकाळ असल्याने सर्व लोक घरातच होते; परंतु तरुणांच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली. 

या घटनेची माहिती समजताच गॅस एजन्सीचा मालक व तंत्रज्ञ यांनी घटनास्थळी भेट दिली. गॅस सिलिंडरच्या तोंडाला जो काळ्या रंगाचा रबरी वॉशर होता, तोच कंपनीकडून टाकीला बसविला गेला नव्हता, त्यामुळे गॅसची गळती झाली. टाकीला वॉशर नसणे, हा प्रकार अनेकदा घडत असून आम्हीही याबाबत काळजी घेत आहोत. ग्राहकांनीही नवीन सिलिंडर जोडताना वॉशर आहे की नाही, याची खात्री करावी, असे एजन्सीच्या मालकाने सांगितले. 
गॅस एजन्सीच्या मालकाने ग्राहकाची आगीमुळे झालेली भरपाई देण्याचे कबूल केल्याने हे प्रकरण आपापसांत मिटवून घेतले आहे. मात्र, अशा चुकांची माहिती गॅस कंपनीपर्यंत पोचणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com