उंड्रीतभूमीगत गॅस पाईपलाईन गळतीमुळे लागली आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

उंड्री : उंड्रीत काल(शनिवार) सकाळी इरा सोसायटीजवळ भूमीगत गॅस पाईपलाईन गळती होऊन आग लागली. आग लागल्यानंतर प्रचंड आवाज झाला. त्यामूळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. या सोसायटीत राहणाऱ्या घटनेच्य प्रत्यक्षदर्शी महिला "नीला कामत" यांनी दिलेल्या माहीतीनुसार आज सकाळी एमएनजीएलच्या मुख्य गॅसवाहीनी व सोसायटीच्या अंतर्गत वाहिनीला जिथे जोड दिला जातो त्या ठिकाणी गॅस गळती झाली. तिथे आग लागून मोठा आवाज झाला. जवळपास अर्धा तास आग धगधगत होती. 

इरा सोसायटीचे चेअरमन अतीष परदेशी यांनी प्रसंगावधान राखून सोसायटीच्या गॅस वाहीनीचा व्हाल्व बंद केला आणि अनर्थ टळला. दरम्यान अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी पोलिस हजर झाले. सर्वात शेवटी एमएनजीएल (महानगर गॅस लिमिटेड) चे कर्मचारी हजर झाले. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: The gas pipeline due to leakage caused fire