VIDEO : सिलिंडरच्या स्फोटामुळे कात्रज हादरलं

१८ ते २० सिलिंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Cylinder Blast in Katraj
Cylinder Blast in KatrajTeam eSakal

पुणे : शहरातील कात्रज भागात १८ ते २० सिलेंडरचे स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कात्रजमधील गंधर्व लॉ़न्स परिसरात ही भयानक घटना घडली आहे. बारा सिलेंड़रचे स्फोट झाल्यानं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचे वृत्त कळताच अग्निशामक दल (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार अजुनपर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीही घेण्यात आली आहे. (Gas Cylinder Blast in Katraj Pune)

Cylinder Blast in Katraj
जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांना अटक

कात्रज येथील गंधर्व लॉन्सजवळच एक गोडाउन आहे, हे गोडाउन कशाचे आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र मंगळवारी सायंकाळी 5 वाजता अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर नागरीकांना काही कळण्याच्या आताच सुमारे 20 सिलेंडरचे स्फोट झाले. या घटनेत एक व्यक्ति किरकोळ जखमी झाली आहे, दरम्यान, अग्निशामक दल तत्काळ पोचले, त्यांना आग विझविण्यात यश आले आहे.

Cylinder Blast in Katraj
घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्याची पावती ः पवार

दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याबाबातची माहिती अजुन मिळालेली नाही. अग्निशामक दलाकडून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com