बोरी पार्धीत गॅस टाकीचा स्फोट

बोरीपार्धी (ता. दौंड) - स्फोटानंतर जळून खाक झालेले हॉटेलमधील साहित्य.
बोरीपार्धी (ता. दौंड) - स्फोटानंतर जळून खाक झालेले हॉटेलमधील साहित्य.

केडगाव - केडगाव-चौफुला रस्त्यावरील बोरी पार्धी (ता. दौंड) हद्दीतील दरबार बिर्याणी या हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आचारी छोटू ऊर्फ जयुद्दीन खान (रा. बोरी पार्धी, मूळ रा. उत्तर प्रदेश) शहाबुद्दीन सय्यद (रा. पिंपळगाव, ता. दौंड), हॉटेल मालक रणजित विठ्ठल रूपनवर (रा. दापोडी, ता. दौंड) हे तिघे जण जखमी झाले. दापोडी येथील रूपनवर यांचे केडगाव चौफुला रस्त्यावर हॉटेल आहे.

शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हॉटेलमध्ये काम सुरू असताना किचनमध्ये आग लागली. आग लागल्याने हॉटेलमधील सर्व जण बाहेर पळाले. खान, रूपनवर आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. त्या वेळी खान, रूपनवर, सय्यद जखमी झाले. सय्यद हे काय घटना घडली, हे पाहण्यासाठी हॉटेलजवळ गेले होते. ते केडगाव येथून पोस्टमन म्हणून निवृत्त झाले आहेत. स्फोटाचा भीषण आवाज ऐकून घटनास्थळी आलेल्या स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. स्फोटाची तीव्रता भयंकर होती. स्फोटामुळे हॉटेलमधील फायबरचे टेबल, खुर्च्या, पंखा, भांडी, फ्रिज, खिडकी यांचा चक्काचूर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com