गॅसने भरलेला टॅंकर ओढ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

चाकण - खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण- तळेगाव राज्य मार्गावर सोमवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडियन ऑइल कंपनीचा गॅसचा टॅंकर चालकाचा ताबा सुटून पंधरा फूट खोल ओढ्यात पडला.

टॅंकरमध्ये घरगुती वापराचा सुमारे ३४ टन गॅस होता. सुदैवाने टॅंकरमधून गॅसगळती होत नव्हती. घटनास्थळी दोन अग्निशमन बंब ठेवण्यात आले होते. चार क्रेनच्या साह्याने पावणेसातच्या सुमारास टॅंकर बाहेर काढला, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी दिली.

गॅस टॅंकर मुंबईहून तळेगाव बाजूकडून चाकण, रासे येथील इंडियन ऑइल कंपनीत चालला होता. चालकाचा टॅंकरवरील ताबा सुटल्याने टॅंकर भरधाव वेगात महादेवी मंदिराजवळील ओढ्यात पडला. 

अपघातानंतर चालक पळून गेला होता. टॅंकर क्रेनच्या साह्याने वर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या रस्त्यावरील वाहतूक औद्योगिक वसाहतीतील रस्त्याने तळेगाव, पुणे, नाशिक बाजूकडे वळविण्यात आली होती. टॅंकर ओढ्यात उलटल्याची माहिती पोलिस पाटील किरण किर्ते यांनी पोलिसांना दिली. टॅंकर खराबवाडी गावाजवळ उलटल्याने, तसेच जवळ मोठी रहिवासी वस्ती असल्याने नागरिकांत मात्र भीती पसरली होती. इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी घटनास्थळी परिस्थितीवर नजर ठेवून होते. 

अपघाताची दुसरी घटना...
खराबवाडी गावात यापूर्वीही गॅस टॅंकर उलटला होता. त्यानंतर ही दुसरी घटना आहे. गॅसची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी या वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. हा मार्ग मोठ्या वर्दळीचा तसेच रहिवासी वस्ती जवळ असलेला आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर नागरिकांत भीती पसरते. 

Web Title: gas Tanker Accident