गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Court_Decision.jpg
Court_Decision.jpg

पुणे : एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे अंतरिम सुरक्षा न मिळाल्यास त्यांना अटक होण्याची शक्‍यता आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण 11 नोव्हेंबरला संपले आहे. मात्र अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना दिले होते. त्यामुळे आता जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवलाखा हे पुन्हा अंतरिम संरक्षण मिळण्यासाठी अर्ज करू शकता. यापूर्वी आनंद तेलतुंबडे यांना अशा प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com