भीमा-कोरेगाव प्रकरण : गौतम नवलाखा यांना उच्च न्यायालयात दिलासा

Gautam Navlakha gets relief from High Court for Bheema Koregaon case
Gautam Navlakha gets relief from High Court for Bheema Koregaon case

पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. त्यांना दोन नोव्हेंबरपर्यंत अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत.

यापुढे आनंद तेलतुंबडे आणि नवलाखा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होणार आहे. नवलाखा यांचा अटकपूर्व जामीन मंगळवारी (ता. 12) येथील न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी पुन्हा तीन दिवसांचे अंतरिम संरक्षण मिळावे यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्याविरोधात पोलिसांना प्रथमदर्शनी सबळ पुरावे मिळून आले असून पुढील तपासकरिता त्यांना अटक करणे आवश्‍यक आहे.

आत्तापर्यंत त्यांना वेळोवेळी न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिलेले आहे, असे नमूद करीत न्यायालयाने तोही अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com