मेट्रो पिलरसाठी जिओ टॅगिंग लवकरच

Metro
Metro

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे पिलर उभारण्याचे ठिकाण निश्‍चित करण्यासाठी लवकरच जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. जिओ टॅगिंग झाल्यानंतर त्याचा आराखडा करण्यात येणार असून, पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कार्यरत आहेत. या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी सुमारे दोन लाख नागरिक येत असतात. वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प हाती घेतला.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाने यापूर्वीच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गास आणि स्थानकांना मान्यता दिली आहे. हा मेट्रो मार्ग २३.३ किलोमीटर लांबीचा असून, यावर एकूण २३ स्थानके नियोजित आहेत. हा प्रकल्प राज्य शासनाने १८ जुलै २०१८ रोजी महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. टाटा व सिमेन्स ही कंपनी या मेट्रो प्रकल्पाचे काम करण्यास पात्र ठरली आहे. या कंपनीकडून मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी आवश्‍यक असलेली पूर्वतयारी वेगाने सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com