सराईत गुन्हेगारांकडून चोरीच्या 11 दुचाकी हस्तगत 

संदीप घिसे 
शनिवार, 14 जुलै 2018

पिंपरी : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या 11 दुचाकी हस्तगत केल्या. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

पिंपरी : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या 11 दुचाकी हस्तगत केल्या. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

अरबाज बशीर शेख (वय 21, रा. मु.पो.गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहायक आयुक्‍त कल्याणराव विधाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार धनराज किरनाळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की दुचाकी चोरी करणारा एकजण मुंबई बंगलोर महामार्गावरील साईसागर हॉटेलजवळ थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अरबाज शेख याला ताब्यात घेतले. त्यास विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा आणि वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच अशा एकूण तीन लाख 30 हजार रुपयांच्या 11 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. 

आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांना दुचाकीच्या हॅंडलच लॉक तोडून किंवा बनावट चावीचा वापर करून चारीत करीत असे. चोरी केलेल्या दुचाकी तो आपल्या ओळखीच्या व्यक्‍तींना कागदपत्र नंतर देतो, असे सांगत स्वस्तात विकत असे. मिळालेल्या पैशातून तो मौजमजा करीत असे. 

वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश माने पोलिस हवालदार धनराज किरनाळे, दादा पवार, बिभीषण कन्हेरकर, बापू धुमाळ, अशोक दुधवणे, विक्रांत गायकवाड, मधुकर चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Get 11 two wheeler for criminals