पालिका शाळेतील साहित्य वेळेत मिळावे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पिंपरी - पालिका शाळेतील शिक्षण साहित्य वेळेत मिळावे, अन्यथा महापालिका आवारातच शाळा भरवून अभिनव पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेने मंगळवारी (ता. 16) दिला. संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. 

गव्हाणे म्हणाले, ""महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे भवितव्य सध्या अंधारात आहे. दुसऱ्या बाजूला पालिकेची शिक्षण समितीदेखील स्थापन झालेली नाही. या समितीचे स्वरूप, अधिकार यासंदर्भातदेखील अजून कोणताही खुलासा महापालिका प्रशासनाकडून आलेला नाही. महापालिका शाळांमध्ये सध्या 40 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य दिले जावे. सध्याच्या शिक्षण मंडळाचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. सरकारच्या एका निर्णयामुळे आता नवीन शिक्षण मंडळ अस्तित्वात येऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूला पालिकेच्या उदासीनतेमुळे शिक्षण समिती स्थापन करण्याची कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या गोंधळात शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्पच मंजूर करण्यात आलेला नाही. 

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत शालेय साहित्याचा प्रश्‍न अधांतरी राहिला आहे. याबाबत पालिका आयुक्तांनी योग्य ती कारवाई करून तोडगा काढावा. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी चांगल्या दर्जाचे व सर्वप्रकारचे साहित्य एकत्र एकाच दिवशी मिळावे.'' याप्रसंगी कार्याध्यक्ष उमेश काटे, अक्षय शेडगे, विशाल परदेशी, विनायक जायभाये आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Get the book of the municipal school in time ncp demand