"एसएमएस'द्वारे घरपोच पुस्तक मिळवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे - ऍडॉल्फ हिटलर याला इतिहासात जर्मनीचा हुकूमशहा म्हणून स्थान मिळाले असले, तरी त्याचा लढा वाचकांच्या मनात आजही रुंजी घालत आहे. "संपूर्ण चातुर्मास' या धार्मिक पुस्तकाचे स्थानही अबाधित आहे. 

पुणे - ऍडॉल्फ हिटलर याला इतिहासात जर्मनीचा हुकूमशहा म्हणून स्थान मिळाले असले, तरी त्याचा लढा वाचकांच्या मनात आजही रुंजी घालत आहे. "संपूर्ण चातुर्मास' या धार्मिक पुस्तकाचे स्थानही अबाधित आहे. 

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मुलांसोबतच नागरिकांमध्येही वाचनाची गोडी वाढावी, यासाठी मनसेच्या नगरसेविका ऍड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या प्रभागात "एसएमएस करा आणि पुस्तक मिळवा' हा अभिनव उपक्रम राबवला आहे. "शनिवार पेठ-सदाशिव पेठ' या प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी त्यांना हव्या असलेल्या पुस्तकाचे नाव केवळ एसएमएस करून कळवल्यास ते पुस्तक घरपोच देण्याची सुविधा या उपक्रमांतर्गत करण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल 101 पुस्तकांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये धार्मिक, क्रीडा, संभाषण, वेद, व्यवसायविषयक मार्गदर्शन, चातुर्मास, पदवीनंतरचे कोर्सेस, विविध प्रकारच्या लघुउद्योगांबाबतचे मार्गदर्शन, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेदिक, भगवान गौतमबुद्धांचे चरित्र, कायदेविषयक, घरचा वैद्य, स्मरणशक्ती कशी वाढवावी, यापासून तर संभाषणचातुर्य, व्यावहारिक वर्तणूक, तणावमुक्ती, अभ्यासाचे तंत्र आदी पुस्तकांचा समावेश आहे. यापैकी वाचकांनी हिटलरच्या "माझा लढा' या मराठीतील पुस्तकाला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्याखालोखाल संपूर्ण चातुर्मास, आजीबाईचा बटवा, गोंदवलेकर महाराजांचे चरित्र यांना मागणी असल्याचे ऍड. पाटील-ठोंबरे यांनी सांगितले. तरुणांनी व्यक्तिमत्त्व विकास, इंटरव्ह्यू आणि करिअरविषयक पुस्तकांना प्राधान्य दिले आहे. तर वेद, भगवद्‌गीता यासह आध्यात्मिक पुस्तकांचीही नागरिकांना मोठी गोडी आहे. 

""मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, वाचन संस्कृती टिकविण्यासाठी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनाचे मोठे महत्त्व आहे. वाचाल तर वाचाल या विचारानुसार केवळ "वाचण्या'साठीच नाही तर उत्तम नागरिक घडविण्यासाठीही वाचन संस्कार गरजेचे आहेत. आज मोबाईलच्या जमान्यात वाचनाची गोडी कायम रहावी, ही बाब विचारात घेऊन नागरिकांना पुस्तके भेट देण्याचा हा उपक्रम राबविला जात आहे.''

- ऍड. रूपाली पाटील-ठोंबरे (नगरसेविका) 

Web Title: Get home delivery book by SMS