दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत भरघोस परतावा : शहा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

 भारतीय अर्थव्यवस्था चार वर्षांपूर्वी जगात दहाव्या स्थानावर होती. आजमितीला ती ब्रिटनच्याही पुढे, पाचव्या स्थानावर आहे.

पुणे : भारतीय अर्थव्यवस्था चार वर्षांपूर्वी जगात दहाव्या स्थानावर होती. आजमितीला ती ब्रिटनच्याही पुढे, पाचव्या स्थानावर आहे. या काळात बॉलिवूड चित्रपटांची बॉक्‍स ऑफिसवरील कमाई 400 कोटींवरून 1100 कोटींवर गेली, ग्रामीण भागात ट्रॅक्‍टरची विक्री अत्युच्च पातळीवर पोचली आहे. लोकांची क्रयशक्ती वाढल्याचे हे निदर्शक आहेत. या पार्श्‍वभूमीवर दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीत नक्कीच भरभरून परतावा मिळेल, असे कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांनी सांगितले. 

गुंतवणूकदार जागर अभियानाचा भाग म्हणून "पिफा'ने आयोजित केलेल्या स्मार्ट मनी ते चर्चासत्रात बोलत होते. 
आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाचे अर्थ सल्लागार हितेश माळी यांनी पुढील पंधरा वर्षे भारतासाठी चांगली व सुखसमृद्धीची असतील असे सांगत शेअरबाजाराचा निर्देशांक बघण्यापेक्षा देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न कसे वाढते आहे हे बघणे आवश्‍यक आहे, असे सांगितले. 

ते म्हणाले, ""म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा गुंतवणूक योजनेचा भाग असू शकतो. आपले गुंतवणुकीचे ध्येय निश्‍चित करणे अत्यावश्‍यक आहे. पिफाचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आभार मानले. भूषण महाजन यांनी पिफाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. हर्षवर्धन भुसारी यांनी सूत्रसंचालन केले. संदीप भूशेट्टी व बिना शेट्टी यांनी वक्‍त्यांची ओळख करून दिली. 

Web Title: get huge return for long term investment says Shah