वाहतुक पोलिसांच्या कामाबाबत माहिती घेणार - पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

" वाहतुक पोलिसांच्या चौकांमध्ये नियमन करण्याबाबत अनेक प्रतिक्रया आहेत. मात्र प्रत्यक्षात काय स्थिती आहे, याची संबंधित चौकांमधील सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य पद्धतीने पाहणी केली जाईल.''
get information about the work of traffic police Commissioner of Police Amitabh Gupta pune
get information about the work of traffic police Commissioner of Police Amitabh Gupta puneSakal

पुणे : " वाहतुक पोलिसांच्या चौकांमध्ये नियमन करण्याबाबत अनेक प्रतिक्रया आहेत. मात्र प्रत्यक्षात काय स्थिती आहे, याची संबंधित चौकांमधील सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य पद्धतीने पाहणी केली जाईल.'' असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी स्पष्ट केले. शहरात वाहतुक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतानाही वाहतुक पोलिसांकडून वाहतुक नियमनाऐवजी दंडात्मक कारवाईवरच भर दिला जात होता. याबाबत नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्याविषयीच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतुक पोलिसांची कानऊघडणी केली होती.

वाहतुक पोलिसांच्या मनमानी कारभाराला पोलिस आयुक्तांनी चाप लावत दंडात्मक कारवाईपेक्षा वाहतुक नियमनावर भर देण्याचे आदेश दिले. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी वाहतुक नियमन करण्याची गरज होती. प्रत्यक्षात चौक, रस्त्यांवर वाहतुक पोलिसच दिसत नसल्याची नागरीकांच्या तक्रारी आहेत. याबाबत पोलिस आयुक्त गुप्ता यांना प्रश्‍न विचारला असता, त्यांनी स्पष्टीकरण दिले."" पोलिस चौकांमध्ये वाहतुक नियमन करीत आहेत. परंतु वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे अनुभव येत आहेत. त्यामुळे वाहतुक पोलिस खरोखरच नियमन करतात की नाही, याबाबत सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जाईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com