पवनेतील जलपर्णीत अडकलेल्या कुत्र्याच्या पिलास जिवदान

रमेश मोरे
शुक्रवार, 8 जून 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील पवना नदी दशक्रिया विधी घाटाजवळ पवना नदीपात्रात जलपर्णीमधुन लहान कुत्र्याच्या पिलाचा विव्हळण्याचा केविलवाणा आवाज येत होता. नेहमी वर्दळीचा असलेला इंद्रप्रस्थ चौकातील वाहनांच्या आवाजाने कुत्र्याच्या पिल्लाच्या आवाजाची दिशा कळत नव्हती.

वहात आलेल्या दाट जलपर्णीत अडकलेले पिल्लु नेमके कुठे आहे हे लक्षात येत नव्हते. याच चौकात शिवामृत वॉशींग सेंटरवर स्थानिक पत्रकार मंडळी उपस्थित होती. नदीपात्रातील जलपर्णीतुनच मधुन मधुन कुत्र्याच्या पिलाचा आवाज येत असल्याचे लक्षात येताच प्राणीमित्र पशु वन्य जिव संस्थेच्या विनायक बडदे यांना बोलावण्यात आले. दाट जलपर्णीमुळे कुत्र्याचे पिलु नजरेस येत नव्हते. नदीकाठी खेळत खेळत दाट जलपर्णीत अडकुन निपचित पडलेल्या कुत्र्याच्या पिलाचे केविलवाणे विव्हळणे अधुन मधुन शांत होत होते.

अखेर प्राणीमित्र विनायक बडदे, स्थानिक पत्रकार व नागरीकांच्या मदतीने काठ्यांच्या सहाय्याने जलपर्णी हटवुन पिलास बाहेर काढले. पिलास कपड्याच्या सहाय्याने स्वच्छ करून खायला दिले. रात्रीच्या अंधारात नदीकाठी अन्नाच्या शोधात हे पिल्लु नदीपात्रातील जलपर्णीत अडकले असावे असा अंदाज बडदे यांनी व्यक्त केला. थोड्याच वेळात हायसे वाटु लागल्याने या पिलाने आईच्या शोधात धुम ठोकली.

Web Title: get life to dog who trapped in jalparni in pavna

टॅग्स