शेतातील बिळात अडकलेल्या नागाला तीन दिवसानंतर जीवदान 

snake
snake

जुन्नर (पुणे) : पिंपळगाव सिद्धनाथ (ता.जुन्नर) येथील शेतकरी खंडू मारुती पानसरे यांच्या  शेतातील बिळात अडकलेल्या कोब्रा प्रजातीच्या दुर्मिळ नागाची तीन दिवसांनी सुटका झाली. 

याबाबतची माहिती अशी की,  तीन दिवसापूर्वी शेतात कांदा लागवडीचे काम सुरू होते. कांद्याची लागवड झालेल्या एका वाफ्यात  नाग चिखलात रुतून बसला असल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी आपल्या मुलास सांगितले. तो शुक्रवारी ता.8 रोजी गावी  तीन दिवसानंतर गावी आला असता सापाची आठवण झाली.  तो कांद्याच्या शेतात गेला असता त्याठिकाणी अडकलेला साप आढळुन आल्याने त्याने जुन्नर वनविभागातील वनरक्षक रमेश खरमाळे यांचेशी संपर्क साधला. रमेश व प्रवीण खरमाळे त्या ठिकाणी पोहोचले यावेळी ग्रामस्थांनी साप पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

सापाला बिळातून काढण्यासाठी खोदकाम करणे गरजेचे होते. खरमाळे यांनी आकाश परदेशी या सर्पमित्राला मदतीसाठी बोलावून घेतले. या दोघांनी कोबरा प्रजातीच्या सुमारे पाच लांबीच्या नागास खोदुन बाहेर काढले. दुर्मिळ होत चाललेल्या कोब्रा या प्रजातीच्या नागास जीवदान मिळाले. रमेश खरमाळे यांनी या नागास त्यांच्या अधिवासात सोडून दिले. पिंपळगाव सिद्धनाथ येथील ग्रामस्थ प्रवीण खरमाळे, मच्छिंद्र पानसरे, दिनकर नायकोडी,किरण खंडागळे, मीननाथ पानसरे, बाळू भालींगे, गणेश कबाडी, वसंत कबाडी आदी ग्रामस्थ मदतीसाठी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com