घन:श्याम क्षीरसागर.
घन:श्याम क्षीरसागर.

घनःश्याम क्षीरसागर यांच्या शोधनिबंध व संशोधन कार्यास या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

इंदापूर - इंदापूर (जि. पुणे) येथील घनःश्याम बाळकृष्ण क्षीरसागर (वय २८) यांच्या शोधनिबंध व संशोधन कार्यास स्पेशल रेकॉग्निशन अवॉर्ड अंडर रिसर्च एक्सलन्स या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते सध्या आय टी, रायपूर येथे पीएचडी करत असून तो सध्या इंदापूरचा युथ आयकॉन म्हणून ओळखला जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उजनी धरण व्यवस्थापनाचे जेष्ठ अभियंता बाळकृष्ण क्षीरसागर यांचे ते चिरंजीव असून त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण श्री ना. रा. हायस्कुल, इंदापूर येथे घेतल्यानंतर उपकरणे व नियंत्रण या शाखेची अभियांत्रिकी पदवी पुण्यात पूर्ण केली. एम टेकचे पदव्युत्तर शिक्षण व्हीआयटी, वेल्लोर मधून बायोमेडीकल अभियांत्रिकी शाखेतून पूर्ण केले. एम टेक प्रवेशापासूनच त्यांनी संशोधनास सुरुवातकेली. त्यांनी अनेक लहान-मोठे शोध लावले असून सिग्नल प्रोसेसिंग व इमेजिंग क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. एमटेकची इंटर्नशिप हीचंदिगड येथील सीएसआयओ याकेंद्रशासनाच्या संस्थेत पुर्ण केली. एमटेक नंतर त्यांनी एनआयटी, रायपूर (नीट रायपूर) या केंद्र शासकीय संस्थेत प्रथम जेआरएफ व नंतर एसआरएफ म्हणून काम केले. त्यानंतर पीएचडीस प्रवेश घेतला. सध्या ह्युमन ब्रेन अँड कॉम्पुटर इंटर फेस या विषयावर ते संशोधन करत आहेत.

मानवी मेंदूतील संवेदन लहरींचे देवनागरीलिपी मध्ये संगणकीकरण करणे या विषयी त्यांनी मोलाचे संशोधन केले आहे. या संशोधनामुळे दिव्यांग तसेच ब्रेन हेमरेज, कोमातील रुग्णांच्या विचारप्रक्रिया, शारीरिक गरजा इत्यादी मेंदूतील सिग्नल्स हे सेन्सरच्या सहाय्याने डीसप्ले होऊ शकतात. हे अत्यंत क्रांतिकारक संशोधन आहे. या संशोधनात त्यांना डॉ. नरेन्द्र लोंढे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. घन:श्याम यांना आत्तापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सन २०१७ मध्ये बेस्ट पेपर प्रेझेंटर हा आंतरराष्ट्रीय सन्मान, सन २०१८ मध्ये यंग साइंटिस्ट अवार्ड व आत्ता स्पेशलरिकोग्निशन अवॉर्ड अंडर रीसर्च एक्सलंस कॅटेगरी या परितोषिकांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आत्तापर्यंत त्यांचे ४ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय सायंटिफिक जर्नल मध्ये प्रकाशित झाले असून विविध ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ परीषदामध्ये त्यांनी वेगळे ६ शोध निबंध सादर केले आहेत. त्यांच्या संशोधनावर आधारीत २ धडे हे आंतरराष्ट्रीय रिसर्च आणि तांत्रिक शिक्षण पुस्तकासाठी स्वीकृत झाले असून प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांचे दोन पेटंट सुद्धा जमा असून त्याची एक्स्पर्टद्वारा पाहणी चालू आहे. साधी राहणी, संयमी व प्रगल्भ विचारसरणी साठी ते प्रसिद्ध असून ग्रामीण भागातील या युवा संशोधकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com