लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर ‘घंटानाद’

लोकमान्य नगर - महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन वंदना चव्हाण यांना दिले.
लोकमान्य नगर - महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन वंदना चव्हाण यांना दिले.

पुणे - विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळातर्फे राज्यातील सर्व खासदार आणि आमदारांच्या घरांसमोर शुक्रवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. पुण्यात या आंदोलनात विविध कष्टकरी संघटना सहभागी झाल्या होत्या.

कामगार नेते डॉ. बाबा आढाव याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्यात माथाडी कायद्यात बदल करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महामंडळातर्फे सातत्याने आंदोलन केले जात आहे. राज्यात ठिकठिकाणी परिषदा, मेळावा, सभांमधून या बदलांना विरोध करण्यासाठी जागृती केली जात आहे. महामंडळाने विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वीही आंदोलने केली आहेत; राज्य सरकारकडून केवळ आश्‍वासनच मिळत असल्याने आंदोलकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

पुण्यात खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, ॲड. वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, विजय काळे, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदिश मुळीक, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर कष्टकऱ्यांनी घंटानाद केला. या लोकप्रतिनिधींना मागण्यांचे निवेदन दिले. हमाल पंचायत, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना, रिक्षा पंचायत, टेंपो पंचायत, पथारी पंचायत, कागद काच पत्रा आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

...या आहेत मागण्या
शेतकरी, अंगमेहनती कष्टकरी वर्गाला पेन्शन मिळावी, अन्नसुरक्षा कायद्याचे संरक्षण सर्वांना मिळावे, माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजवणी व्हावी, शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा, सर्वांना शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत द्याव्यात, तरुणांना रोजगार मिळावा, दुष्काळ निवारण्यासाठी सर्व समावेशक समिती गठित करावी, माफक दरात घरकुल योजना राबवावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com