घरकुल आधी, की मुलांचे शाळाप्रवेश

पीतांबर लोहार
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पिंपरी  - दहा टक्के स्वहिस्सा भरून घरकूल मिळतेय. पण लग्नसराईचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचे शुल्क भरण्याचा कालावधी, यामुळे नेमके कशाला प्राधान्य द्यायचे, याचा पेच अनेक लाभार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. 

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत महापालिकेने चिखली येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी १३ हजार २५० घरांचा घरकुल प्रकल्प राबविला आहे. त्यातील सहा हजार ७२० लाभार्थींची यादी जुलै २०११ मध्ये महापालिकेने प्रसिद्ध केली होती.

त्यातील अनेक कुटुंबे त्या ठिकाणी राहायला गेली आहेत. त्या वेळच्या प्रतीक्षा यादीतील ८६४ लाभार्थींच्या घरकुलाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना सदनिकेच्या १० टक्के, अर्थात तीन लाख ७६ हजार रुपये स्वहिस्सा भरायचा आहे. त्यासाठी बॅंकांकडून कर्ज मिळणार आहे. मात्र अनामत रक्कम म्हणून ५० हजार रुपये (डिपॉझिट) बॅंक खात्यात भरायचे आहेत. काहींनी दोन वर्षांपूर्वीच २५ हजार रुपये भरले आहेत. त्यांना आणखी २५ हजार रुपये भरायचे आहेत. मात्र लग्नसराई व मुलांचे शाळाप्रवेश यामुळे एवढी रक्कम भरणे शक्‍य नसल्याचे काही लाभार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मुलांचे शाळेचे शुल्क भरले, तर घर जातेय आणि घरकुलासाठी पैसे भरले, तर मुलांच्या शिक्षणाचे काय, असा पेच त्यांच्यापुढे आहे.

घरकुलासाठी दोन वर्षांपूर्वी २५ हजार रुपये बॅंक खात्यात भरले आहेत. आणखी २५ हजार रुपये भरायचे आहेत. शिवाय तारणासाठी वकिलाची फी १० हजार रुपये वेगळे भरायचे आहेत. तारणासाठी १५ दिवसांची मुदत आहे. मुलांच्या प्रवेशाचे पैसेही भरायचे आहेत. तारणाची मुदत वाढवावी व अनामत रक्कम कमी करावी. 
- राजेंद्र पाटील, कासारवाडी, घरकूल लाभार्थी

लाभार्थींना स्वहिस्सा रक्कम तीन लाख ७६ हजार रुपये भरायचे आहेत. त्यासाठी बॅंका त्यांना कर्ज देणार असून, ५० हजार रुपये अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे. पूर्वीच्या लाभार्थींनी कर्जाचे हप्तेही थकविले आहेत. नवीन लाभार्थींबाबत महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे विचाराधीन आहे. 
- चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, महापालिका

Web Title: gharkul Beneficiary gharkul child school admission issue