घरकुल योजनेतील कामांना प्राधान्य द्या - दीपक म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - सर्व घरकुल योजनांमार्फत नागरिकांना लाभ मिळणे आवश्‍यक आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांकडे लक्ष द्यावे. तसेच, वंचित लाभार्थ्यांना तातडीने घरे मिळतील, यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

पुणे - सर्व घरकुल योजनांमार्फत नागरिकांना लाभ मिळणे आवश्‍यक आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांकडे लक्ष द्यावे. तसेच, वंचित लाभार्थ्यांना तातडीने घरे मिळतील, यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

विभागीय आयुक्तालयात घरकुल योजनांच्या संबंधित आढावा बैठकीत ते बोलत होते. अधिकाऱ्यांनी सर्व घरकुल योजनांमधील घरकुलांची कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रलंबित कामांमध्ये सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी, पारधी आवास योजना; तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना अशा केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत विविध योजनांचा आढावा त्यांनी या वेळी घेतला. राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक धनंजय माळी, पुणे विभागातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गट विकास अधिकारी या वेळी उपस्थित होते.

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर पाहणी
विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र देहू येथील विविध विकासकामांची पाहणी केली.

सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय भोसले आदी या वेळी उपस्थित होते. म्हैसेकर यांनी विविध ठिकाणी भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: gharkul scheme work deepak mhaiskar