esakal | घोडेगाव: कायमस्वरुपी तलाठी नेमावा यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

घोडेगाव: कायमस्वरुपी तलाठी नेमावा यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

घोडेगाव: कायमस्वरुपी तलाठी नेमावा यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे बदली होऊन गेलेल्या तलाठी भाऊसाहेबांना महिना झाला. तरीही घोडेगाव येथे कायस्वरूपी नवीन तलाठी न आल्याने नागरिक व शेतकऱ्यांची कामे होत नाही. म्हणून ग्रामस्थांनी गांधीगीरी पध्दतीने घोडेगाव तलाठी कार्यालय येथील तलाठी भाऊसाहेबांच्या खुर्चीला हार घालून आपला निषेध व्यक्त केला.

हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाचे दोन डोस बंधनकारक

घोडेगाव येथे कायस्वरूपी असणारे तलाठी संजय गायकवाड यांची पदन्नोती झाल्याने ते एक महिन्यापूर्वी जुन्नर येथे रूजु झाले. त्यानंतर घोडेगाव येथे तात्पुरत्या स्वरूपात तलाठी म्हणून नेमणूक करण्यात आली. परंतु घोडेगाव तलाठी कार्यालया अंतर्गत घोडेगावसह, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, गावरवाडी कोलदरा-गोनवडी, कोळवाडी-कोटमदारा आदी सुमारे तीन हजार खातेदार असल्याने येथे कायमस्वरूपी तलाठी भाऊसाहेब मिळावे.

यासाठी घोडेगाव ग्रामस्थांनी तलाठी यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगीरी पध्दतीने आपला निषेध व्यक्त केला. घोडेगाव येथे वीसहून अधिक शासकीय कारले आहेत. हे तालुक्याचे ठिकाण असल्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. येथे कायमस्वरूपी तलाठी नेमावा अशी मागणी असते.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, सुदाम काळे, सुनिल इंदोरे, दिनेश घुले, नवनाथ काळे, गोविंद भास्कर, प्रकाश काळे आदि उपस्थित होते.

loading image
go to top