Pune : वेल्हे तालुक्यातील विविध सोसायटी संचालक मंडळ बरखास्त; पाच वर्ष निवडणूकीसाठी अपात्रतेचा आदेश

संचालक मंडळास पाच वर्ष निवडणूकीसाठी अपात्रतेचा आदेश
Pune : वेल्हे तालुक्यातील विविध सोसायटी संचालक मंडळ बरखास्त; पाच वर्ष निवडणूकीसाठी अपात्रतेचा आदेश

वेल्हे,(पुणे ) : सोसायटीचे कागदोपत्री रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे व नियमबाह्य कामकाजाचा ठपका ठेवून घोलपघर ( ता.वेल्हे ) येथील राजेंद्र विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ सहकार विभागाने बरखास्त केले असून संचालक मंडळास पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यात येणार नसल्याचा आदेश देण्यात आला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपुर्वी दापोडे सोसायटी बरखास्त केल्यानंतर सहाय्यक निबंधक वेल्हे यांच्याकडून राजेंद्र विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ आज सोमवार (ता. १५) रोजी बरखास्त केल्याने तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजेंद्र सोसायटीच्या गैरकारभारा बाबत सोसायटीचे सभासद अनिल जगताप व ज्ञानोबा पोळेकर या शेतकऱ्यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती.

त्याची दखल घेत वेल्हे तालुका सहाय्यक निबंधक रुपाली माने व तपासणी अधिकारी पी. एम. तमनर यांनी सोसायटीच्या कामकाजाची तपासणी केली. त्यात संस्थेच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळल्या. संस्थेचे अभिलेख आणि लेखापुस्तके योग्य नमुन्यात ठेवली नसल्याचे तसेच अनियमिता अढळली.

त्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सहाय्यक निबंधक रुपाली माने यांनी सांगितले्.

सहाय्यक निबंधक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक पी ‌.एम. तमनर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार शेतकरी अनिल जगताप म्हणाले गेल्या दीड वर्षापासून सोसायटीच्या कारभारामध्ये कामकाज नियमबाह्य होत असल्याच्या वारंवार तक्रारी आम्ही करत होतो यास आज यश आले आहे.

राजेंद्र विविध सोसायटीचे चेअरमन ज्ञानोबा कुंभारकर म्हणाले, सदरील कारवाईच चुकीची व अन्यायकारक असुन शेतकरी सभासदांचे म्हणणे जाणून न घेता, कोणतीही सूचना न देता राजकीय सूडबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com