नगरसेवकांच्या मानधनातून दिंडीप्रमुखांना भेटवस्तू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसमवेत येणाऱ्या दिंडीप्रमुखांना ताडपत्री किंवा तंबू देण्याचे नियोजन सोमवारी (ता. 2) महापालिकेतील गटनेते व नगरसेवकांच्या बैठकीत ठरले. महापालिका खर्चाने ही भेटवस्तू न देता पदाधिकारी व नगरसेवक यांच्या मानधनातून संबंधित भेटवस्तू दिली जाणार आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा महापालिका खर्चाने भेटवस्तू देता येणार नसल्याने यातून मार्ग काढण्यासाठी महापौर कार्यालयात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीला महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार हिंगे आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे भेटवस्तू देण्याची परंपरा खंडित न करता या वर्षीदेखील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याचे बैठकीत निश्‍चित करण्यात आले. 

"नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या मानधनातून दिंडीप्रमुखांना उपयोगी पडेल अशी भेटवस्तू देण्याचे नियोजन  ठरले आहे. 
 - नितीन काळजे, महापौर

"दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याचा निर्णय झाला नसता तर "टाळ कुटो' आंदोलन करणार होतो. त्यासाठी चिखली, तळवडे परिसरातील वारकरी टाळ-पखवाज घेऊन तयार होते. मात्र, त्याबाबत निर्णय झाल्याने हे आंदोलन मागे घेतले.'' 
- दत्ता साने, विरोधी पक्षनेते

Web Title: gift to dindipramukh in palakahi from corporators fund