अवैध कटआउटमुळे एक्‍स्प्रेस वेवर गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

जबाबदार नेत्यांनी आणि त्यांच्या जबाबदार कार्यकर्त्यांनी नागरिकांसमोर आदर्श काम उभे करावे की अवैध होर्डिंग्ज? 

आपली प्रतिक्रिया 
ट्‌विट करा, फेसबुकवर पोस्ट करा ##WhyHoarding हा हॅशटॅग वापरून 
ई मेल कराः webeditor@esakal.com 

पुणे - महामार्गांवर होर्डिंग उभारण्यास बंदी असतानाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बापट यांचे कटआउट्‌स बेकायदा उभे केल्याचे शुक्रवारी आढळून आले. या मार्गावरील टोल नाक्‍यांवरही "कटआउट' लावल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. 

भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त शुक्रवारी मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. त्याचाच भाग म्हणून मुंबईला जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्याच्या उद्देशाने बापट यांच्या समर्थकांनी या मार्गावर जागोजागी त्यांचे कटआउट लावले. त्यासाठी संबंधित यंत्रणांची परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारमधील एका मंत्र्यांचे अशा प्रकारे बेकायदा कटआउट लावल्याची चर्चा सोशल मीडियावरही रंगली आहे. 

माझे कटआउट कुठे आणि कोणी लावले आहेत, याची कल्पना नाही; पण कार्यकर्त्यांनी कटआउट लावले असावेत, ते काढले जातील. 
गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठामंत्री 

Web Title: girish bapat cutouts on Expressway