पालकमंत्री बापट आज इंदापूर दौऱ्यावर

Girish-Bapat
Girish-Bapat

शेटफळगढे - पालकमंत्री गिरीश बापट शनिवारी (ता. १३) इंदापूर तालुक्‍याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती भाजपचे इंदापूर तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी दिली.

या दौऱ्यात सकाळी ११ वाजता शिरसोडी येथील ३३/११ केव्हीच्या उपकेंद्राच्या क्षमता वाढीचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता गोखळी येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा भूमिपूजन समारंभ आणि नूतन सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ बापट यांच्या हस्ते होईल. 

दुपारी साडेबारा वाजता निमगाव केतकी येथे संत सावता माळी मंदिरात ते विविध विषयांवर ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. जीवन प्राधिकरणाकडे असलेली व्याहाळीची पाणी योजना सुरू करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला जाणार आहे. 

याचठिकाणी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. यानंतर निमगाव केतकीतील भाजपच्या शाखेचा उद्‌घाटन समारंभ त्यांच्या हस्ते होणार असून, ते ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांशी व वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत उपचारासंदर्भात चर्चा करणार आहेत. यानंतर दुपारी दीड वाजता सणसर येथील विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com